Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महामेट्रोचे झिरो माईल स्टेशन आणि फ्रिडम पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तू

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
nagpur

मुक्तपीठ टीम

महामेट्रोने नागपूरात स्थापन केलेले सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गिका तसेच फ्रीडम पार्क हे नागपूरच्या वैभवात भर टाकतील. नागपूरमध्ये जागतिक दर्जाची बरीच कामे होत आहेत. पहिल्यांदाच आपल्या देशात टू टायर मेट्रोची उभारणी महामेट्रोतर्फे करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क या 1.6 किमी लांब मार्गाचे उदघाटन आज स्थानिक झिरो माईल येथे झाले . त्यावेळी गडकरी बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून केंद्रीय मंत्र्यासोबत या मार्गिकेवर धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेलला झेंडा दाखवून रवाना केले .

nagpur

जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली . मेट्रो प्रकल्पाचे उन्नत -एलिव्हेटेड मार्ग तयार करताना या मार्गाच्या खाली सुद्धा सौंदर्यीकरण तसेच नागरिकांना काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष द्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विकास झाला पाहिजे पण त्यात कुठलीही उणीव किंवा कमतरता राहिली नाही पाहिजे याची खात्री आपण घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी सुद्धा पुढच्या ७५ व्या वर्षापर्यंत टिकेल असे चांगलं काम आपण जनतेसाठी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

कॉटन मार्केट वरून झिरो माईलला पोहोचण्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मधून एक भूयारी मार्ग मंजूर करणार!

झिरो माईल स्टेशन येथे कॉटन मार्केट या स्थानावरून ट्रफिक सिग्नलच्या अडथळ्याशिवाय पोहचण्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मधून एक भूयारी मार्ग मंजूर करू असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी दिले .नागपूर शहरातील तेलंखेडी तलाव तसेच उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरण यामध्ये महा मेट्रोची खूप मदत झाली असेही त्यांनी सांगितलं.

nagpur

मेट्रोच्या फेज दोनचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितलं. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन चालू केला आहे . राज्याला आवश्यक तो सर्व निधी केंद्र सरकार तर्फे दिला जाईल मुंबई ठाण्याच्या विकासाकरिता अतिरिक्त १ लाख कोटी रुपयांचा निधी सुद्धा मुंबईच्या प्रस्तावित बैठकीमध्ये देण्याचं आश्वासन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेना यावेळी दिले.

 

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला २१ ऑगस्ट २०१४ रोजी मंजुरी देण्यात आली आणि त्याची पायाभरणी त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

नागपूरची माझी मेट्रो एक ग्रीन मेट्रो आहे, ज्यामध्ये एकूण ऊर्जेच्या ६५% सौर ऊर्जचा वापर , पाण्याचा १००% पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे संवर्धन होते . सर्व स्थानकांवर बायो डायजेस्टर्सही आहेत. मेट्रोला ६०% हुन अधिक महसूल नॉन-फेअर-बॉक्समधून प्राप्त होतो. नागपूर मेट्रो हरित ऊर्जा वापरत असल्याने हा प्रकल्प एक स्वच्छ तसेच शाश्वत प्रारुप म्हणून सक्षम असल्याचे केंद्रीय नगर विकास तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर मेट्रोचा हा प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . कस्तुरचंद पार्कची स्थापत्य कला पारंपरिक राजपूत पद्धतीने साकारली असून कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकाचा दर्शनी भाग आणि त्याची स्थापत्य कला याच धर्तीवर साकारली आहे. राजपूत स्थापत्य कलेचे सांकेतिक भाग जसे छत्री, तोरण, राजपूत जाळी, कॉलमवरील नक्काशी मेट्रो स्थानकात दर्शवल्या गेली आहे. यामुळे शहरात एक अनोखी वास्तू निर्माण होण्यास मदत मिळाली आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

nagpur

झिरो माइलचे ऐतिहासिक महत्त्व

नागपूरचा झिरो माइल हे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचे स्थळ असून १९०७ साली ब्रिटिशांनी द ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्वेचा प्रारंभ झिरो माइल या नागपुरातल्या स्थळातून केला होता अशी माहिती महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

 

१.६ किलोमीटर लांब या सीताबर्डी-कस्तुरचंद पार्क मार्गिकेवरील मेट्रो प्रवास आज पासून सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडेल जातील. हा मार्ग नागपूर शहरातील विधान भवन , भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरीस कॉलेज.अशा अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो. नागपुरात स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन हे देशातील अश्या प्रकारचे पहिले मेट्रो स्थानक असेल जे एका भव्य २० मजली इमारतीचा भाग असेल आणि ज्याच्या चौथ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेन अवागमन करेल.

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्कचे निर्माण झाले याचेही उद्घाटन आज पार पडले. या स्थानकाचे नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवले आहे. यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवल्या आहेत. युद्धात वापरलेला टी -55 रणगाडा देखील येथे नागपूरकरांना बघता यावे म्हणून स्थापित केला आहे. फ्रिडम पार्कच्या आत डाव्या बाजूला अँफी थियेटर आहे. येथील हिस्ट्री वॉल शाहिद स्मारक पर्यंत आहे.

 

मेट्रो रेल्वे नागपूरच्या या मार्गाच्या उद्घाटनासह, भारताने १८ शहरांमध्ये ७२५ किलोमीटरचे मेट्रो रेल्वे कव्हरेज साध्य केले आहे, ज्यामध्ये दिल्ली मेट्रोचा मोठा वाटा आहे.


Tags: Eknath Shindemumbainagpurदिल्ली मेट्रोपंतप्रधान नरेंद्र मोदीमहामेट्रोमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई
Previous Post

मुंबईतील ‘सीप्झ’चे नुतनीकरण आणि पुनर्बांधणीवर २०० कोटी रुपये खर्च करणार!

Next Post

राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्समध्ये १९ जागांसाठी करिअर संधी

Next Post
RCF

राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्समध्ये १९ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!