Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांच्या संरक्षणाचे तंत्रज्ञान!

भारतीय हवाई दलासाठी डीआरडीओने विकसित केले आधुनिक शाफ तंत्रज्ञान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
DRDO

मुक्तपीठ टीम

शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी तंत्रज्ञान उद्योगांकडे हस्तांतरित तंत्रज्ञान वापराच्या यशस्वी चाचण्यांनंतर भारतीय हवाई दलाने वापर करण्याची प्रक्रिया सुरु केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या विकसनाला ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने डीआरडीओने उचललेले आणखी एक पाऊल म्हटले डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आधुनिक शाफ तंत्रज्ञान (Chaff Technology) विकसित केले आहे. जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुण्यातील एचईएमआरएल अर्थात उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा या डीआरडीओच्या संस्थांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118/I कार्ट्रीज तयार केले आहे.

  • सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे.
  • विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी सीएमडीएस ही प्रणाली वापरण्यात येते.
  • शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.
    भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

संरक्षणमंत्र्यांकडून डीआरडीओचे कौतुक

या महत्वाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे संशोधन केल्याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल तसेच उद्योग क्षेत्राचे कौतुक करून याला ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने डीआरडीओने टाकलेले आणखी एक पाऊल म्हटले आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत भर टाकणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या यशस्वी शोधाशी संबंधित पथकांचे केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी अभिनंदन केले आहे.

 


Tags: Chaff TechnologyDefense Minister Rajnath SinghDRDOआत्मनिर्भर भारतडीआरडीओडॉ. जी सतीश रेड्डीभारतीय हवाई दलमंत्री राजनाथ सिंगशाफ तंत्रज्ञान
Previous Post

आता रेल्वे स्थानकांवर सामान सुरक्षित ठेवण्यासाठी स्मार्ट क्लॉक रुम…डिजिटल सुरक्षा!

Next Post

मुंबईतील ‘सीप्झ’चे नुतनीकरण आणि पुनर्बांधणीवर २०० कोटी रुपये खर्च करणार!

Next Post
speez

मुंबईतील 'सीप्झ'चे नुतनीकरण आणि पुनर्बांधणीवर २०० कोटी रुपये खर्च करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!