Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दाऊद इब्राहिमशी घनिष्ठ संबंध, खंडणीचा आरोप, गँगस्टर कम पोलीस खबरी रियाझ भाटी जेरबंद!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Riyaz Bhati arrested in extortion case

मुक्तपीठ टीम

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी शाखेच्या पथकाने सोमवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा व्यापारी रियाझ भाटी याला खंडणीशी संबंधित एका प्रकरणात अटक केली. आरोपीला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाटीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात तो हवा होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

  • रियाझ भाटी आणि मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट यांनी वर्सोव्यातील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
  • हे दोघेही दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचे जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • भाटी आणि सलीम फ्रूट यांनी व्यापाऱ्याकडून ३० लाख रुपयांची कार आणि ७.५ लाख रुपयांची रोकड घेतली.
  • इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकील आणि शकीलचा जवळचा सलीम फ्रूट यांचीही एफआयआरमध्ये नावे असल्याचे त्यांनी सांगितले.
  • मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने (AEC) अंधेरी पश्चिम येथून आरोपीला अटक केली आहे.
  • एईसी कार्यालयात चौकशी केल्यानंतर भाटीला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

भाटी याला यापूर्वी खंडणी, जमीन हडप, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याने २०१५ आणि २०२० मध्ये बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सलीम फ्रूट याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) डी कंपनी सिंडिकेटविरुद्धच्या प्रकरणात अटक केली होती. सलीम फ्रूट न्यायालयीन कोठडीत आहे.


Tags: Dawood Ibrahimmumbai policeRiyaz Bhatiदाऊद इब्राहिममुंबई पोलीसरियाझ भाटी
Previous Post

अखेर ‘पीएफआय’वर बंदी! आता उघड कारवाया बंद!! अधिसूचना जारी!!

Next Post

राज्यपालांची अधिकार वापसी! सरकार बरोबरच उदय सामंतांचं खातं बदललं आणि निर्णयही!

Next Post
when will maharashtra shidne fadnavis ministry will expand

राज्यपालांची अधिकार वापसी! सरकार बरोबरच उदय सामंतांचं खातं बदललं आणि निर्णयही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!