Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांची अधिकार वापसी! सरकार बरोबरच उदय सामंतांचं खातं बदललं आणि निर्णयही!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
when will maharashtra shidne fadnavis ministry will expand

मुक्तपीठ टीम

शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मागे घेतला आहे. खरेतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये सुधारणा केली होती. या कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे राज्यपालांचे अधिकार कमी झाले आणि राज्य सरकारला कुलगुरू पदासाठी नावांची शिफारस करण्याचा अधिकार दिला. आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचे अधिकार पुन्हा राज्यपालांच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे सरकारने जाहीर केला आहे.

राज्य विद्यापीठांमधील कुलगुरूंच्या नियुक्तीतील राज्यपालांच्या अधिकारात कपात करणारे विधेयक महाराष्ट्र सरकारने मंगळवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र विधानसभेच्या २०२१ च्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या या दुरुस्तीमध्ये राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची विद्यापीठांचे प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या निर्णयाला विरोध केला होता आणि विधेयक मंजूर करताना सभात्यागही केला होता. या दुरुस्तीमुळे विद्यापीठांची स्वायत्तता संपुष्टात येईल, असा दावा भाजपाने केला होता. हे विधेयक तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडले होते, ज्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत आणि सध्या ते उद्योगमंत्री आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करणारे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने या कायद्यात सुधारणा केली होती. ज्या राज्यपालांशी तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे असमाधानकारक संबंध होते, त्यांचे अधिकार कमी करण्याचा या दुरुस्तीचा हेतू होता. परंतु, हे विधेयक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) तरतुदींच्या विरोधात असल्याचे कारण देत ते मंजूर करण्यात आले नाही. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


Tags: उदय सांमतकुलगुरुमहाविकास आघाडीराज्यपालशिंदे-फडणवीस सरकार
Previous Post

दाऊद इब्राहिमशी घनिष्ठ संबंध, खंडणीचा आरोप, गँगस्टर कम पोलीस खबरी रियाझ भाटी जेरबंद!

Next Post

गुगलचं एक सिक्रेट: ‘हे’ सर्च केलंत दर दिसणार मजेदार स्फोट!

Next Post
NASA DART Mission

गुगलचं एक सिक्रेट: 'हे' सर्च केलंत दर दिसणार मजेदार स्फोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!