मुक्तपीठ टीम
आपल्या बॉलीवूडचे बिग-बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज ८०वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारतीय सिनेसृष्टीला भरभरून योगदान दिलं आहे. त्यांचा जीवन संघर्ष आणि त्यांची जिद्द यामुळे त्यांची प्रसिद्धी ही भारतातच नाही तर जगभरात आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आज हे स्थान मिळवले आहे.
अमिताभ आज भले त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात असतील, पण एक वेळ अशी होती जेव्हा त्यांना त्यांच्या आवाजामुळे ऑल इंडिया रेडिओवर नकाराचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत आपल्या संघर्षमय दिवसांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले होते. एवढ्या वयात सुद्धा अमिताभ यांचं काम एखाद्या तरुणाला लाजवेल असं आहे. आजही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हीट होतात. नुकताच त्याचा गुडबाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या नावामागचे रहस्य…
अमिताभ बच्चन यांच्या नावामागे एक गंमत आहे. त्यांचे खरे नाव इन्कलाब असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला. पण केबीसीच्या एका एपिसोडमध्ये बिग बींनी गौप्यस्फोट केला होता की, त्यांचे नाव कधीही इन्कलाब ठेवण्यात आले नाही. त्यांचे नाव एका प्रसिद्ध कवीने ठेवले आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या नामकरणाबाबत हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे…
- हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या ‘नीड का निर्माण फिर’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडात याचा उल्लेख केला आहे.
- ते लिहितात की, जेव्हा त्यांची पत्नी तेजी बच्चन गरोदर होती आणि त्यांना प्रसूती वेदना होत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना हे जाणून घेण्यासाठी एका पुस्तकाची मदत घ्यावी लागली.
- यानंतर त्यांनी ताबडतोब लेडी डॉक्टर ब्रार यांना बोलावले आणि त्यांनी त्यांना आपल्या मोटरमध्ये बसवून नर्सिंग होममध्ये नेले.
- त्यानंतर त्यांची पत्नी तेजी बच्चन यांनी एका लाडक्या मुलाला जन्म दिला. हरिवंशराय बच्चन यांनी याबद्दल आत्मचरित्रात नमूद केले आहे
- सुमित्रा नंदन पंत या प्रसिद्ध कवी आहेत, त्या संध्याकाळी त्यांची पत्नी आणि नवजात मुलाला भेटायला आले. मुलाला पाहताच त्यांनी त्याचे नाव अमिताभ ठेवले.
- वडील झाल्याचा आनंदही त्यांनी सांगितला आहे. . अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सुमित्रानंदन पंत यांनीच त्यांचे नाव ठेवल्याचे सांगितले.
अमिताभ बच्चन असे म्हणतात की, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो. अमिताभ बच्चन यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले आहे. जया बच्चन यांच्या आयुष्यात आल्यापासून त्यांच्या नशिबच चमकले आणि ते सुपरहिरो ठरले.
अमिताभ आणि जया बच्चन यांच्यातली केमेस्ट्री-
- अमिताभ यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना जया म्हणाल्या होत्या, “माझी त्यांच्याशी ‘गुड्डी’च्या सेटवर ओळख झाली होती.
- अमिताभ हे हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा असल्यामुळे मी त्यांच्यावर खूप प्रभावित झाले होते.
- तसेच, जया बच्चन यांचा एका मॅग्जीनवर फोटो पाहताच अमिताभही त्यांच्या प्रेमात पडले होते.
- वडिलांचा हा शब्द अमिताभ बच्चन यांनी लगेच मान्य केला आणि दोघांनी १९७३ मध्ये एकमेकांसोबत लग्न केले.
- हळूहळू हे नाते खूप घट्ट होत गेले. आजही हे जोडपे आपल्या मुलांसोबत चांगला वेळ घालवतात.
- अमिताभ बच्चन यांचे ‘गॉडफादर’ कोण?
- महमूद १९४० ते १९५० दरम्यान हिंदी चित्रपटात उत्कृष्ट अभिनेता तसेच विनोदी कलाकार होते.
- त्यांनी सलग चार दशके ३०० हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
- कॉमेडियन म्हणून मेहमूद हे त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले, पण त्याच्यामुळेच एका स्टारने मनोरंजन विश्वात प्रवेश केला, ज्यासाठी बी-टाऊन नेहमीच त्याचे ऋणी राहील. ते
- दुसरे कोणी नसून अमिताभ बच्चन आहेत. जेव्हा मेहमूद यांना अमिताभ यांच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, बिग बी हे बॉलिवूडमधील सर्वात उंच रेस हॉर्स आहेत आणि ते खूप वेगाने धावू शकतो.
काही दशकांपूर्वी कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या अमिताभ बच्चन यांनी केबीसीनंतर यशोशिखरावर नवी झेप घेतली.
अमिताभ बच्चन आज चित्रपटात काम करण्यासाठी मोठी रक्कम आकारतात
- हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरचा एक मोठा स्टार म्हणजे अमिताभ बच्चन आहेत.
- बिग बी एका चित्रपटासाठी १२ कोटी घेतात.
- एक काळ असा होता की त्यांना पहिला पगार फक्त ५०० रुपये होता.
- त्यांची पहिली नोकरी १९६२मध्ये कोलकात्यात होती, जिथे ते एका शिपिंग फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह होते. त्यांना फक्त ५०० रुपये मिळायचे.
अमिताभ बच्चन हे केबीसीच्या सुरुवातीपासून होस्टिंग करत आहेत. मात्र, शाहरुख खानने एकच सीझन होस्ट केला होता. याचे आयोजन करण्यासाठी ते मोठी रक्कम आकारतात. बिग बी प्रति एपिसोड ४ ते ५ कोटी रुपये घेतात.
त्यांच्या जीवनाचा हा टप्पा राखेतून झेपावणाऱ्या फिनिक्ससारखाच प्रेरणादायी…हा महानायक अस्सल जीवनातील संघर्षामुळेही तसाच प्रेरणादायी महानायकच आहे!
वाचा:
अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…
अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…
महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…
अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!
अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!
अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…
अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…