Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“धार्मिक स्वातंत्र्यामध्ये इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही”

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme court

मुक्तपीठ टीम

धर्मांतराच्या मुद्द्याच्या याचिकेवरील सुनावणी करताना सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सांगितले की, धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये इतर लोकांना विशिष्ट धर्मात धर्मांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट नाही. फसवणूक, जबरदस्ती किंवा प्रलोभनेद्वारे एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर करण्याचा अधिकार निश्चितपणे देत नाही. हे धोक्याची जाणीव आहे आणि समाजातील असुरक्षित घटकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतींवर मात करणारे कायदे आवश्यक आहेत. या वर्गांमध्ये महिला आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचा समावेश आहे.

सरकार धर्मांतराचा गांभीर्याने विचार करेल…

  • अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेला उत्तर देताना केंद्राने आपली भूमिका संक्षिप्त प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केली.
  • याचिकेत ‘धमक्या’ आणि ‘भेटवस्तू आणि आर्थिक लाभ’ याद्वारे फसव्या धर्मांतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे.
  • गृह मंत्रालयाच्या उपसचिवांमार्फत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात भारत सरकार “अत्यंत गांभीर्याने” विचार करेल आणि या रिटमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून आहे. असे लिहीले आहे.

केंद्राचे सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश…

  • या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, हे धर्मांतराच्या विरोधात नाही, तर सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात आहे.
  • राज्य सरकारांची माहिती घेऊन या विषयावर सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने केंद्राला दिले.
  • संबंधित राज्यांकडून आवश्यक माहिती गोळा केल्यानंतर सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले.
  • आम्ही धर्मांतराच्या विरोधात नाही, मात्र सक्तीचे धर्मांतर होऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
  • खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
  • ही याचिका कायम ठेवण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीही खंडपीठाने पुढे ढकलली.

Tags: Caste TransformationReligious FreedomSupreme Courtधर्मांतर कायदाधार्मिक स्वातंत्र्य
Previous Post

DHFL कर्ज घोटाळा: ८७ शेल कंपन्या, २ लाख ६० हजार बनावट कर्जदार! मनी लाँड्रिंगसाठी आभासी शाखा!!

Next Post

शालेय प्रवेशापासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंत जन्म प्रमाणपत्र होणार अनिवार्य!

Next Post
Birth Certificate

शालेय प्रवेशापासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंत जन्म प्रमाणपत्र होणार अनिवार्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!