Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थितीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची नोंदणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Iffi International Film Festival

मुक्तपीठ टीम

गोवा येथे होणार असलेल्या बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची नोंदणी आता सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत होत असलेल्या या महोत्सवाला डिजिटल माध्यमाच्या मदतीने आभासी पद्धतीने उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांसाठी ही व्यवस्था आहे.

 

खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून ही नोंदणी पार पाडता येईल.

https://virtual.iffigoa.org

अजूनही अस्तित्वात असलेला कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता आशियातील या सर्वात जुन्या आणि भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाचे स्वरूप यंदाही हायब्रीड अर्थात संमिश्र असेल. त्यामुळे महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

 

बहुतांश चित्रपटांचे प्रसारण ऑनलाईन होईल. याशिवाय सर्व पत्रकार परिषदा या youtube.com/pibindia. या पीआयबी इंडियाच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केल्या जातील. या पत्रकार परिषदांमध्ये ऑनलाइन प्रश्न विचारण्याची संधी प्रसार माध्यम प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येईल.

 

  • १ जानेवारी २०२१ रोजी २१ वर्षे पूर्ण झालेले माध्यम प्रतिनिधी या महोत्सवाला उपस्थिती लावण्यास पात्र आहेत.
  • प्रसार माध्यमांना विनाशुल्क नोंदणी करता येईल. अधिकृत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना महोत्सवाला उपस्थिती लावण्यासाठीची लॉगिनविषयक माहिती मेल /एसएमएस मार्फत कळवली जाईल.
  • माध्यम प्रतिनिधींना आभासी पद्धतीने पुरवण्यात आलेली नोंदणी ही हस्तांतरित करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आभासी मंचावरील कार्यक्रमापुरतीच ही नोंदणी मर्यादित असेल व महोत्सवात प्रत्यक्ष उपस्थितीसाठी वापरता येणार नाही.
  • बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहू इच्छिणार्‍या प्रसार माध्यम प्रतिनिधींनी https://my.iffigoa.org/extranet/media/ येथे नोंदणी करावी.

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल माहिती

  • भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ईफ्फी १९५२ मध्ये सुरु झाला. हा आशियातील सर्वाधिक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो.
  • दरवर्षी भरवला जाणारा हा चित्रपट महोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही गोव्यात पार पडणार आहे. जागतिक चित्रपटांना एका मंचावर आणून चित्रपट कलेतील गुणवत्ता प्रदर्शित करण्याची संधी मिळावी, विविध देशांमधील चित्रपटांना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून समजून घेण्याची आणि त्याद्वारे तेथील चित्रपट कलेचा आनंद घेण्याची संधी सर्वांना मिळावी आणि त्याद्वारे जगभरात लोकांमध्ये मैत्री व सहकार्याची भावना दृढ व्हावी हा या महोत्सवाला मागील उद्देश आहे.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव महासंचालनालय आणि गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
  • ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती महोत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळावर तसेच ईफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ट्विटर ,फेसबुक , इंस्टाग्राम या समाज माध्यम हँडलवर तसेच गोवा पत्र सूचना कार्यालय आणि मुंबई पत्र सूचना कार्यालय यांच्या समाज माध्यम हँडलवर मिळेल. या महोत्सवाचे ऑनलाइन माहितीपत्रक उपलब्ध आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Goaiffigoamedia representativesregistrationइफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवगोवाडिजिटल माध्यमप्रसारमाध्यम प्रतिनिधी
Previous Post

तंत्रज्ञान आधारित वस्त्राची निर्यात ३ वर्षांत पाच पटीने वाढवत २ अब्ज डॉलरवरून १० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य!

Next Post

आयबीपीएसमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या १,८२८ जागांसाठी भरती

Next Post
ibps

आयबीपीएसमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या १,८२८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!