Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तंत्रज्ञान आधारित वस्त्राची निर्यात ३ वर्षांत पाच पटीने वाढवत २ अब्ज डॉलरवरून १० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Union Minister of Textiles, Shri Piyush Goyal

मुक्तपीठ टीम

येत्या ३ वर्षात तंत्रज्ञान आधारित वस्त्रांच्या निर्यातीत ५ पट वाढ करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्याची वेळ आली आहे असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी दिल्लीत भारतीय तंत्रविषयक वस्त्रोद्योग संस्थेच्या (आयटीटीए) प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्या ३ वर्षात तंत्रज्ञान आधारित वस्त्रांच्या निर्यातीत ५ पट वाढ करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्याची वेळ आली आहे असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी आज दिल्लीत भारतीय तंत्रविषयक वस्त्रोद्योग संस्थेच्या (आयटीटीए) प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. राज्यांमधील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला केन्द्र सरकार मदत करेल. वस्त्र उत्पादनासाठी विकासाला सहाय्य करेल आणि स्वस्त जमीन आणि वीज यांसारख्या स्वस्त पायाभूत सुविधा देऊ करेल असे ते म्हणाले.

 

आपण वस्त्र उत्पादनातील सर्वोत्तम मानकांशी जुळवून घेतले पाहिजे असे गोयल यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ग्राहकांसाठी वस्त्राच्या गुणवत्तेत कोणताही फरक नसावा. तंत्रज्ञान आधारित वस्त्रातील संशोधन आणि विकासामध्ये सरकारी निधीचा वापर करण्यासाठी सार्वजनिक खाजगी सहभागाची सूचना मंत्रीमहोदयांनी केली.

 

भारतातील तंत्रज्ञान आधारित वस्त्र क्षेत्राच्या वाढीला गेल्या ५ वर्षात वेग आला आहे, सध्या वार्षिक दर ८% दराने वाढत आहे. पुढील ५ वर्षांमध्ये ही वाढ  १५-२०% पर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

सध्याची जागतिक बाजारपेठ २५० अब्ज अमेरीकी डॉलर (१८ लाख कोटी) आहे. त्यात भारताचा वाटा १९ अब्ज अमेरीकी डॉलर आहे. या बाजारपेठेत ४० अब्ज अमेरीकी डॉलरसह (८% वाटा) भारत हा महत्त्वाकांक्षी स्पर्धक आहे.

 

त्यांनी पुढे नमूद केले की ही उद्दिष्टे लक्षात घेऊन, भारताला जगातील स्वावलंबी, चैतन्यदायी, निर्यातभिमुख अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान आधारित वस्त्रोद्योग अभियान सुरू केले आहे.

 

जानेवारी २०१९ मध्ये, भारतात प्रथमच, तंत्रज्ञान आधारित वस्त्रासाठी २०७ HSN कोड जारी केले आहे. २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत भारत तंत्रज्ञान आधारित वस्त्राचा प्रमुख निर्यातदार बनला आहे. २०२०-२१ या वर्षात, भारताचा प्रमुख वाटा पीपीई, एन-९५ आणि सर्जिकल मास्क, पीपीई किट आणि मास्कसाठीच्या वस्त्रांच्या निर्यातीत राहिला आहे असे गोयल यांनी सांगितले.

 

तंत्रज्ञान आधारित वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना मंत्री महोदयांनी, कृषी/फलोत्पादन, महामार्ग, रेल्वे, जलस्रोत, वैद्यकीय अनुप्रयोग अशा सरकारी संस्थांना वापरण्यासाठी ९२ वस्तू अनिवार्य करण्यात आल्या आहेत अशी माहिती दिली.

 

तंत्रज्ञान आधारित वस्त्र हे असे कापड आहे, जे विशिष्ट वापरादरम्यान योग्य परिणाम प्राप्त करण्यासाठी घडवले आहे. यात मूळ कच्चा माल म्हणजे ताग, रेशीम आणि कापूस यांसारखे नैसर्गिक तंतू वापरले आहेत. तंत्रज्ञान आधारित वस्त्र हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. आपल्या जगण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलून टाकणारी ही पुढील तंत्रज्ञान आधारित क्रांती असणार आहे.

 

त्यांच्या वापराच्या प्रकारानुसार, तंत्रज्ञान आधारित वस्त्र विभाग १२ उप-विभागांमध्ये विभागलेला आहे. भारतात, आवरण संबंधित वस्त्रोद्योग (पॅकटेक): ३८%, (जिओटेक्निकल) भूतंत्र आधारित वस्त्रोद्योग (जिओ-टेक): १०%, कृषी वस्त्रे (ऍग्रोटेक): १२% मध्ये भारताची प्रमुख उपस्थिती आहे. नवीन साहित्यामुळे तंत्रज्ञान आधारित वस्त्राच्या वापराची क्षेत्रे दिवसेंदिवस विस्तारत आहेत.

 

तंत्रज्ञान आधारित वस्त्रोद्योगातील संशोधन, नवोन्मेष आणि विकास (प्रधान वैज्ञानिक सल्लागार, सदस्य (एस अँड टी) निती आयोगाचे सह-अध्यक्ष) समितीने आतापर्यंत ३६ प्रस्तावांवर विचार केला आहे आणि २० प्रस्तावांची शिफारस केली आहे.

 

आयटीटीए ही तंत्रज्ञान आधारित वस्त्रांच्या उत्पादकांच्या लघु आणि मध्यम विभागाची संघटना आहे. त्यांच्या ९०% सदस्यांची वार्षिक उलाढाल रु. १००/- कोटीपेक्षा कमी आहे. बहुतेक धोरणे, कार्यक्रमांबाबत नियमितपणे वस्त्रोद्योग मंत्रालय आयटीटीएकडून माहिती घेत असते.

पाहा व्हिडीओ: 


Tags: exports technologyIndiapiyush goyaltextilesUnion Minister of Textilesआयटीटीएपियूष गोयलभारतमुक्तपीठवस्त्रोद्योग
Previous Post

कृषी क्षेत्रासाठी खास ड्रोन्स! गरुड एरोस्पेसकडून १ हजार ड्रोनची निर्मिती!

Next Post

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थितीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची नोंदणी

Next Post
Iffi International Film Festival

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थितीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!