मुक्तपीठ टीम
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात सिनियर कंसल्टंट, कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, इलेक्ट्रिकल सुपरवाइजर ऑपरेटर कम टेक्निशियन, माइनिंग मेट, ब्लास्टर, बॉयलर ऑपरेशन्स परेटर कम टेक्निशियन एस-३, बॉयलर ऑपरेशन्स ऑपरेटर कम टेक्निशियन एस-१, ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन-HVD, ट्रेनी फायरमन कम फायर इंजिन ड्राइव्हर या पदांसाठी एकूण २५७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमानुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४४ वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३८ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ३४ वर्षांपर्यंत, पद क्र.४ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.५ साठी ३४ किंवा ३२ वर्षांपर्यंत, पद क्र.६ आणि १२ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र.७,६,९,१०,११,१३,१४,१५,१६ आणि १७ साठी २८ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
- पद क्र. १ ते ६ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
- पद क्र. ७,८,९,१२ आणि १४ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
- पद क्र. १०,११,१३,१५,१६ आणि १७ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://sailcareers.com/secure?app_id=UElZMDAwMDAwMQ==
अधिकृत वेबसाइट
https://drive.google.com/file/d/1ptTiA_qQbPi5JhrBRRlqqTYudRwRgODS/view