मुक्तपीठ टीम
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात वेलफेयर ऑफिसर, टेक्निकल कंट्रोल सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग सुपरवाइजर, अधिकृत भाषा सुपरवाइजर, सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल, ज्युनियर टेक्निशियन वर्कशॉप या पदांसाठी एकूण १४९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी
- पद क्र.२- प्रिंटिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.टेक/ बी.ई/ बी.एससी (प्रिंटिंग)
- पद क्र.३- प्रिंटिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.टेक/ बी.ई/ बी.एससी (प्रिंटिंग)
- पद क्र.४- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) हिंदी/ इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव
- पद क्र.५- १) ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी २) हिंदी/ इंग्रजी स्टेनोग्राफी ८० श.प्र.मि. ३) इंग्रजी/ हिंदी टायपिंग ४० श.प्र.मि.
- पद क्र.६- १) ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी २) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि./ हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
- पद क्र.७- आयटीआय (ऑफसेट मशीन माइंडर/ लेटर प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेट मेकिंग/ इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा आयटीआय/ एनसीव्हीटी (प्लेट मेकर कम-इम्पोझिटर/ हँड कंपोझिंग)
- पद क्र.८- आयटीआय/ एनसीव्हीटी (मेकॅनिकल/ एसी/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयाच्या अधिकृत वेबसाइट https://cnpnashik.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.