मुक्तपीठ टीम
बीपीएनएल म्हणजेच भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये नियोजन माहिती अधिकारी, नियोजन खंड अधिकारी आणि नियोजन सहाय्यक या पदांसाठी एकूण २,३२५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२१ म्हणजेच उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- नियोजन माहिती अधिकारी – ग्रॅज्युएशन पदवी, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
- नियोजन खंड अधिकारी- या पदासाठी १२वी किंवा मार्केटिंग डिप्लोमा आणि नामांकित बोर्डाकडून मार्केटिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- नियोजन सहाय्यक- या पदासाठी नामांकित बोर्डाकडून १०वी किंवा मार्केटिंग डिप्लोमा आणि मार्केटिंगमधील अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
नियोजन माहिती अधिकारी या पदासाठी उमेदवारांकडून ५९० रूपये, नियोजन खंड अधिकारी या पदासाठी ७०८ रूपये तर, नियोजन सहाय्यक या पदासाठी ८२६ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
परीक्षेचा नमुना
- विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची संगणक आधारित लेखी परीक्षा असेल.
- चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
- हिंदी, इंग्रजी, गणित, मार्केटिंग, संगणकाचे मूलभूत तत्त्व अशा प्रत्येक विषयातून १० प्रश्न विचारले जातील. या सर्व प्रश्नांना १० गुण असतील. हे पूर्ण करण्यासाठी ३० मिनिटे उपलब्ध असतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- बीपीएनएलच्या अधिकृत वेबसाइट www.bharatiyapashupalan.com वर जा.
- येथे वेबसाइटच्या होम पेजवर, “अप्लाय ऑनलाइन” वर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, त्यानंतर “अप्लाय ऑनलाइन लिंक” वर क्लिक करा.
- येथे दिलेली माहिती भरा.
- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
- त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी भारतीय पशुपालन निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.bharatiyapashupalan.com वरून माहिती मिळवू शकता.