मुक्तपीठ टीम
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात अधिकृत भाषा सिनियर असिस्टंट या पदासाठी ०६ जागा, एचआर ज्युनियर असिस्टंट या पदासाठी ०७ जागा, ऑपरेशन्स सिनियर असिस्टंट या पदासाठी ०४ जागा, इलेक्ट्रॉनिक्स सिनियर असिस्टंट या पदासाठी ०३ जागा, फायनान्स सिनियर असिस्टंट या पदासाठी १२ जागा, फायर सर्व्हिसेस ज्युनियर असिस्टंट या पदासाठी २३ जागा अशा एकूण ५५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ २ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/ इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/ डिप्लोमा किंवा २ वर्षे भाषांतराचा अनुभव + ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) पदवीधर २) इंग्रजी टायपिंग/ हिंदी टायपिंग ३) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) पदवीधर २) हलके वाहन चालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ रेडिओ इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) बीकॉम २) ०३ ते ०६ महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) ५०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ फायर इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण २) अवजड/ मध्यम/ हलके वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाणार एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.aai.aero/en/recruitment/release/296232
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1mAPtQ5S0c8Sx0bU0CYWxT2bHVWLlruOJ/view