मुक्तपीठ टीम
आयबीपीएसमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या आयटी ऑफिसर (स्केल- १) या पदासाठी २२० जागा, ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ८८४ जागा, राजभाषा अधिकारी (स्केल-१) या पदासाठी ८४ जागा, लॉ ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ४४ जागा, एचआर/ पर्सोनेल ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ६१ जागा, मार्केटिंग ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ५३५ जागा अशा एकूण १,८२८ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अॅप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इंस्ट्रुमेंटेशनमध्ये बी.ई/ बी.टेक किंवा पदव्युत्तर पदवी
- पद क्र.२- कृषी/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग/ कृषी-वानिकी/ वानिकी/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ शेती अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.३- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.४- एलएलबी
- पद क्र.५- १) पदवीधर २) पर्सनल मॅनेजमेंट/ औद्योगिक संबंध/ मानव संसाधन/ मानव संसाधन विकास/ सामाजिक कार्य/ कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा
- पद क्र.६- १) पदवीधर २) एमएमएस (मार्केटिंग)/ एमबीए (मार्केटिंग)/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीपीएम/ पीजीडीएम असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वरून माहिती मिळवू शकता.