Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समीर वानखेडेंमुळे आता क्रांती रेडकरच्या बहिणीचा भूतकाळ चर्चेत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
harshada redkar

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांविरोधातील कारवाईमुळे सातत्यानं चर्चेत राहणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना आता त्यांच्या नातेवाईकांच्या भूतकाळाची आठवण करून देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्स व्यवसायात गुंतली आहे का, असा गंभीर प्रश्न विचारला आहे. त्यावर बोलताना वानखेडे यांनी इंकार केलेला नाही. स्पष्टीकरण देत, क्रांती रेडकरची बहिण हर्षदा रेडकरविरोधातील ड्रग्स गुन्ह्याचे प्रकरण जवळपास १३-१४ वर्षे जुनं असल्याचे सांगितले आहे. तसेच हर्षदा रेडकरविरोधात ड्रग्स प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला, तेव्हा क्रांती रेडकरशी लग्नही झाले नव्हते असं म्हटलंय.

 

नवाब मलिक यांचे भुतकाळात डोकावणारे ट्वीट

नवाब मलिक सध्या एखाद्या थरारक वेब सीरीजसारखे रोज नवनवे आरोप करतात. सोमवारी त्यांनी ट्वीट करून नवी खळबळ माजवली. त्यात ट्वीटमध्ये त्यांनी, “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा!” असं लिहिले आहे. त्या ट्वीटसोबत मलिक यांनी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची माहिती देणारे स्क्रिन शॉट्स अटॅच केले आहेत.

 

Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021

समीर वानखेडेंकडून इंकार नाही, पण लग्नाआधीचा गुन्हा असल्याचा दावा

  • माझी मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकरविरुद्ध जानेवारी २००८ मध्ये पुण्यात केस दाखल करण्यात आली होती.
  • तेव्हा मी एनसीबीच्या सेवेत नव्हतो.
  • क्रांती रेडकरशी माझा २०१७मध्ये माझे लग्न झाले.
  • ड्रग्स प्रकरणातील गुन्ह्यानंतर ९ वर्षांनी आमचे लग्न झाले.
  • त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही.
  • ही घटना जुनी असून विनाकारण माझं नाव यात जोडलं जात आहे.

Tags: harshada redkarKranti RedkarNawab MalikNCBSameer Wankhedeएनसीबीनवाब मलिकसमीर वानखेडेहर्षदा रेडकर
Previous Post

आयबीपीएसमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या १,८२८ जागांसाठी भरती

Next Post

खासदार अमोल कोल्हे एकांतवासाच्या भूमिकेत! चालले विपश्यनेला, पण फेबू पोस्टमुळे चर्चा!

Next Post
amol kolhe fb post

खासदार अमोल कोल्हे एकांतवासाच्या भूमिकेत! चालले विपश्यनेला, पण फेबू पोस्टमुळे चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!