Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील पाचोरा – जामनेर मार्गाचा गेज परिवर्तनासह बोदवडपर्यंत विस्तार होणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Pachora - Jamner Railway

मुक्तपीठ टीम

‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या ‘संस्थात्मक चौकटी अंतर्गत स्थापन केलेल्या नेटवर्क नियोजन गटाने परीक्षण करून ३ ऑगस्टला ३ महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची शिफारस केली आहे. शिफारस केलेल्या या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील पाचोरा-जामनेर मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार प्रकल्पासह गोरखपूर छावणी -वाल्मिकीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कटिहार-मुकुरिया आणि कटिहार-कुमेदपूर मार्गाचे दुहेरीकरण यांचा समावेश आहे. लॉजिस्टिक कार्यक्षमतेला गती मिळण्याच्या आणि लॉजिस्टिक खर्चात कपात होण्याच्या अनुषंगाने दुर्गम प्रदेशात मालाची जलद वाहतूक सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सर्व ३ प्रकल्प अतिशय महत्त्वाचे आहेत.

३ हजार दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मार्गांचे ‘उच्च घनता जाळे निर्धारित केले आहे. त्या मोहीमेचा एक भाग म्हणून, अति महत्त्वाचे ३ प्रकल्प खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:

पाचोरा – जामनेर रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे. या अंतर्गत पाचोरा ते जामनेर मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. 84 किमीच्या या प्रकल्पासाठी ९५५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे जळगाव आणि भुसावळला बाह्य दुहेरी मार्ग रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या रेल्वेमार्गामुळे जेएनपीटी ते नागपूर आणि देशाच्या पूर्वेकडील प्रदेशात जलद गतीने मालवाहतूक करण्यास मदत मिळणार आहे.

कटिहार – मुकुरिया आणि कटिहार – कुमेदपूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण

कटिहार – मुकुरिया आणि कटिहार – कुमेदपूर हे जास्त वर्दळ असलेले विभाग आहेत.सध्या हा एकेरी मार्ग असून हा राजधानी रेल्वेगाडीचा मार्ग आहे.ईशान्य आणि हावडा यांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. या विभागांच्या दुहेरीकरणामुळे कोलकाता बंदर ते विराट नगरपर्यंत मालवाहतुकीसाठी मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ९४२ कोटी रुपये आहे.

गोरखपूर छावणी -वाल्मिकीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण :

पश्चिम भारतातून ईशान्येकडील राज्यांमध्ये मालवाहतूक विशेषतः अन्नधान्याची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी गोरखपूर छावणी – वाल्मिकीनगर (९५ किमी.) हा महत्त्वाचा पट्टा आहे. मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या मार्गावर रेल्वे मार्गिका आहे. वाल्मिकीनगरपासून मुझफ्फरपूरपर्यंत दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. ११२० कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावित दुहेरीकरण प्रकल्पामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होणे अपेक्षित आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsGorakhpur Cantonment - Valmikinagar RailwayKatihar - Kumedpur RailwayKatihar - Mukuria RailwaymuktpeethPachora - Jamner Railwayकटिहार - कुमेदपूर रेल्वेमार्गकटिहार - मुकुरिया रेल्वेमार्गगोरखपूर छावणी -वाल्मिकीनगर रेल्वेमार्गघडलं-बिघडलंचांगली बातमीपाचोरा - जामनेर रेल्वेमार्गमुक्तपीठ
Previous Post

टपाल कार्यालयात २५ रुपयात मिळणार राष्ट्रीय ध्वज! ऑनलाइन ऑर्डर सुविधा!

Next Post

इंडिगो एअरलाइन्सची ‘स्वीट १६’ ऑफर आहे तरी काय? आज शेवटचा दिवस…

Next Post
Indigo

इंडिगो एअरलाइन्सची 'स्वीट १६' ऑफर आहे तरी काय? आज शेवटचा दिवस...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!