Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी सहकारी बँकेवर कारवाई, ग्राहक फक्त हजार रुपयेच काढू शकणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
laxmi co bank solapur

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँककडून लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडवर निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान आरबीआयकडून निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याने लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचा आदेश कढला आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता बँकेवर दोन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार लक्ष्मी सहकारी बँक मध्यवर्ती बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. तसेच, बँक कोणतीही गुंतवणूक करणार नाही किंवा कोणतेही पैसे देणार नाही किंवा पेमेंट करण्यास संमती देणार नाही.

बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

 

सहा महिन्यांसाठी निर्बंध

  • आरबीआयने सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादले आहेत.
  • बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.
  • बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
  • रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत लादलेले निर्बंध १२ नोव्हेंबर २०२१ रोजी कामकाजाचे तास बंद झाल्यानंतर सहा महिने लागू राहतील. यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाईल.

 

जम्मू-काश्मीर बँकेचे तिमाही निकाल

  • दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील जम्मू-काश्मीर बँकेचे तिमाही निकाल आले आहेत.
  • सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा दुपटीने वाढून १११.०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेला ४३.९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
  • स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या संप्रेषणात, बँकेने सांगितले की तिमाहीत त्यांचे निव्वळ उत्पन्न वाढून रु.२,२०१,२६ कोटी झाले आहे जे मागील वर्षीच्या तिमाहीत रु २,१९४,४७ कोटी होते.
  • या तिमाहीत बुडीत कर्जे आणि इतर आकस्मिक परिस्थितींसाठी बँकेची तरतूद १९२.६८ कोटींवर घसरली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. ३२४.९२ कोटी होती.

Tags: laxmi sahakari bankRBIsolapurभारतीय रिझर्व्ह बँकलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडसोलापूर
Previous Post

जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

“राज्यातील वाढते बालविवाह, ‘त्या’ गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी पद घालवा”!

Next Post
rupali chakankar

"राज्यातील वाढते बालविवाह, 'त्या' गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी पद घालवा"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!