Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

November 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ajt pawar

मुक्तपीठ टीम

सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

Ajit pawar

जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचे एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आमदार रोहीत पवार, लहू कानडे, निलेश लंके, संग्राम जगताप उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी ४ कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीस शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेनेही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.

 

अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आलं आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. pic.twitter.com/SGioH6T9Oa

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2021

कोरोना संकटातून राज्य सावरत आहे. १० कोटींच्या पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे. असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीपातीच्या विचार न करता समाजाचा, माणूसकीचा विचार करा.

पवार म्हणाले, ऊसाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत. एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. असेही पवार यांनी सांगितले.

खर्डा परिसरातील संत सिताराम गड, संत गीतेबाबा, शिवपट्टण किल्ला, निंबाळकर वाडा, बारा ज्योतिर्लिंग या स्थळांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही पवार यांनी यावेळी दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, कोरोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये ९८ कामांच्या माध्यमातून ६३७ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला.

 

कार्यक्रमापूर्वी चौंडी येथिल राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.

Ajt pawar

जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण, पंचायत समिती दुस-या मजल्याचे बांधकाम, अधिकारी-कर्मचा-यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम, शहरांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता , नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नाना-नानी उद्यान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, मुस्लिम दफनभूमी बांधकाम व सुशोभीकरण अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर १२० कि.मी लांबीचा रस्ता, १४० कोटींच्या पाणी पुरवठा योजना व जामखेड शहरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे डॉ.रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


Tags: Ajt pawarAshok ChavanjamkhedLahu kanadenilesh lankerohit pawarSangram jagtapअशोक चव्हाणजामखेडनिलेश लंकेरोहीत पवारलहू कानडेसंग्राम जगताप
Previous Post

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार

Next Post

रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी सहकारी बँकेवर कारवाई, ग्राहक फक्त हजार रुपयेच काढू शकणार!

Next Post
laxmi co bank solapur

रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी सहकारी बँकेवर कारवाई, ग्राहक फक्त हजार रुपयेच काढू शकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!