Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार-आमदार राणा हनुमान चालिसा वाचण्यासाठी शनिवारी मातोश्रीवर जाणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Navneet And Ravi Rana

मुक्तपीठ टीम

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्याबाहेर हनुमान चालीसा करण्याच्या इशाऱ्यानुसार ते मुंबईत आले आहेत. शिवसेनेकडून सुद्धा राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. सेनेकडून राणांना मातोश्रीवर येण्याचं प्रतिआव्हान देण्यात आलं आहे. अशावेळी राणांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचं जाहीर केले आहे.

 

काय म्हणाले रवी राणा?

  • कितीही विरोध झाला तरी उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार.
  • आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
  • आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी.
  • राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल.
  • शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले.
  • त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले.
  • आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत.
  • दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते.
  • तर, एक वेळा नाही १०० वेळा वाचायला सांगितलं असते.
  • आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही.
  • आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही.

 

शिवसेना भाजपमुळेच सत्तेत…

  • बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती.
  • महाराष्ट्राच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी वाचू दिली असती.
  • महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत.
  • समस्त हिंदू हे पाहत आहेत.
  • ज्यांना आम्ही मुंबईत आलोय हे माहीत नाही.
  • ज्यांनी अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला.
  • मुंबईला पाय ठेवून दाखवा असं म्हटलं होतं.
  • मी पाय नाही, मी जिवंत उभा आहे.
  • हनुमान चालिसा वाचण्यासाठी अशा धमक्या मिळत असतील तर एक नाही शंभर वेळा धमक्या सहन करेल पण आम्ही हनुमान चालिसा वाचणारच.
  • शिवसेना भाजपमुळेच सत्तेत.
  • मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले.
  • आमच्यावर भाजपाचं खापर फोडू नये.
  • आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत.

Tags: cm uddhav thackerayhanuman chalisaMaharashtraMatoshreemumbaiNavneet ranaRavi Ranaनवनीत राणामातोश्रीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरवी राणावर्षा बंगलाहनुमान चालीसा
Previous Post

पोलिसांनी वर्षाआधी चोर पकडला, ३६ किलो सोने, ६ कोटी रोकडही जप्त! पण ईडी, आयटीला तपासात रस नाही!!

Next Post

राजस्थानात शिवमंदिरावर बुलडोझर! काँग्रेस आणि भाजपामध्ये जुंपली!!

Next Post
Shivmandir

राजस्थानात शिवमंदिरावर बुलडोझर! काँग्रेस आणि भाजपामध्ये जुंपली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!