Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजस्थानात शिवमंदिरावर बुलडोझर! काँग्रेस आणि भाजपामध्ये जुंपली!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivmandir

मुक्तपीठ टीम

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील राजगढ येथील ३०० वर्षे जुने शिवमंदिर बुलडोझरने पाडले. यानंतर भाजपने काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याप्रकरणी काँग्रेसला घेरले आहे. करौली आणि जहांगीरपुरी येथे अश्रू ढाळणे आणि हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता असल्याचे ते म्हणाले. मंदिर विध्वंसाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

त्याचवेळी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना स्थानिक नगर पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने कारवाईसाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच २०१८मध्ये भाजपाच्या मंडल अध्यक्षांनी पत्र लिहून अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजरपा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनीही नगरपालिकेतील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं मान्य केलं आहे.

१७ एप्रिल रोजी राजगडचे शिवमंदिर पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मास्टर प्लॅन अंतर्गत शहरातील गोल सर्कल ते जत्रेच्या चौकाचौकात अडथळा ठरणारी दुकाने व घरे पाडण्यासाठी बुलडोझर चालवण्यात आला. या क्रमाने प्रशासनाचे पथक बुलडोझरसह मंदिरापर्यंत पोहोचले, मंदिराला अतिक्रमण म्हणत त्यांनी मंदिराचा घुमट तोडला. यानंतर कटरच्या सहाय्याने शिवलिंग कापण्यात आले. यादरम्यान हनुमानजीसह इतर देवी-देवतांच्या मूर्तींची मोडतोड करण्यात आली आहे.

 

भाजपाला मतदान केल्याचा सूड…

  • मंदिर पाडण्यात आल्याची तक्रार आम्ही काँग्रेस आमदार जोहरीलाल मीना यांच्याकडे केली होती, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
  • तुम्ही भाजपाचे बोर्ड बनवता आणि तक्रार आमच्याकडे करता, असे ते म्हणाले.
  • भाजपाला मतदान केल्याचा सूड उगवला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
  • यामुळे मंदिरे व घरे पाडण्यात आली आहेत.

Tags: BJPCongressrajsthanShiv Mandirकाँग्रेसभाजपाराजस्थानशिवमंदिर
Previous Post

खासदार-आमदार राणा हनुमान चालिसा वाचण्यासाठी शनिवारी मातोश्रीवर जाणार

Next Post

राज्यात १२१ नवे रुग्ण, ६६ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १२१ नवे रुग्ण, ६६ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!