Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हेतल पगारेची IAS होण्याची कडवी जिद्द! दिवसाचे १८ तास अभ्यास!! यशानंतरही करणार पुन्हा प्रयत्न!

September 6, 2026
in प्रेरणा
0
हेतल पगारेची IAS होण्याची कडवी जिद्द! दिवसाचे १८ तास अभ्यास!! यशानंतरही करणार पुन्हा प्रयत्न!

राही भिडे

नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही चांगले यश प्राप्त केले आहे. हेतल पगारे या विद्यार्थींनीने यूपीएससीमध्ये ६३० रँकिंग मिळविले आहे. यामुळे हेतलचं सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.

 

हेतल यूपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती अतिशय दृढ, अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थी आहे. ती तिच्या खोलीत १८ तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास करायची. मला वाटते की, ती तिच्या वडिलांपासून प्रेरणा घेते जे आयएएस आहेत. तिला तिच्या वडिलांप्रमाणे आयएएस अधिकारी व्हायचे आहे. यामुळे ती थोडी चिंतेत आहे. तिला २०० च्या आत रँक मिळवण्याचा पूर्ण विश्वास होता. पण मी तिच्या आत्मविश्वास आणि प्रयत्नांचे कौतुक करते.

 

हेतलचे आईृवडिल हेतलच्या या यशामुळे खुप खुश आहेत. हेतलचे वडील कैलास पगारे हे आता फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तिची आई वंदना पगारे गृहिणी आहे. हेतलसाठी तिची आईही तिची आदर्श आहे. आईने हेतलला खुप पाठींबा दिला. तिची आई एक अतिशय शिस्तबद्ध स्त्री आहे आणि तिची दोन्ही मुले हेतल आणि अनुराग देखील पालकांप्रमाणे मोठी झाली पाहिजेत अशी तिची इच्छा आहे.

 

डी आयएएस बस चुकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा डी परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. विद्यार्थ्यांना आयएएस का व्हायचे आहे? त्यांना नेहमी लोकांसोबत राहायचे आहे, त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, सामान्य जनतेच्या भल्यासाठी धोरण आखायचे आहे. विशेषतः लोकांसाठी आणि सामान्यपणे आपल्या राज्याच्या विकासासाठी ही दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांचे मी कौतुक करते. ऑल द बेस्ट हेतल, तुझा अभिमान आहे!

 

हेतल पगारे ही एक शिस्तबद्ध आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. तिने आपलं शिक्षण सिव्हिल इजिनिअरिंगमध्ये पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड येथे केले आहे. तिने याआधी एमपीएससी दिली आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तिला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालं.

 

हेतलला तिच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. तिचे वडिल हे आयएएस आहेत. लहानपणापासून घरात तसं वातावरण असल्याने तिने लहानपणीचं आयएएसचं स्वप्न पाहिलं. यानंतर तिला यूपीएससीमध्ये ६३० रँकिंग मिळणून ती उत्तीर्ण झाली. तिला आयआरएस एका महिन्याने मिळणार आहे. मात्र पुढे तिचं स्वप्न हे आयएएस अधिकारी होण्याचं आहे. म्हणून ती पुढे आणखी प्रयत्न करणार आहे.

 

rahi bhide

(चार दशकांचा अनुभव असलेल्या राही भिडे या मराठीतील ज्येष्ठ पत्रकार आहेत. दैनिक लोकमतमधील प्रदीर्घ कारकिर्दीनंतर दै. पुण्यनगरीच्या त्या मुख्य संपादिका होत्या. महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण यांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे.)


Tags: Hetal PagareIASRahi BhideUPSCआयएएसनागरी लोकसेवा आयोगयूपीएससीराही भिडेहेतल पगारे
Previous Post

“तारखांवर तारखा देण्याच्या संस्कृतीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे स्वागत”

Next Post

बार्टीचे नऊ विद्यार्थी यावर्षी यूपीएससी परीक्षेत यशस्वी!

Next Post
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020

बार्टीचे नऊ विद्यार्थी यावर्षी यूपीएससी परीक्षेत यशस्वी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!