Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ऊसाच्या फडाला आग लावून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याला ठाकरे सरकारकडून एक रूपयाचीही मदत नाही!”

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
SugarCane Field

राम कुलकर्णी

गाळप हंगाम संपत आला तरीही दोन एकर शेतातला उभा असलेला ऊस कुणीच घेवून जाईना. वैतागून नामदेव जाधव वय ३५ ता.गेवराई या तरूण शेतकर्‍याने उभ्या ऊसाच्या फडाला आग लावली आणि फाशी घेवुन आपले आयुष्य संपवले. एवढी घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ मयताच्या कुटुंबियांची भेट घेवुन आर्थिक मदत द्यायला हवी पण पाच दिवस झाले तरी एक रूपायाची मदत ठाकरे सरकार त्या कुटुंबियाला देणे तर सोडा जिल्हाधिकार्‍यांनी साधी भेटसुद्धा दिली नाही. महाविकास आघाडीचं सरकार किती असंवेदनशील आहे यावरून लक्षात येतं. शिल्लक ऊसाचं काय होणार हा प्रश्न ऐरणीवर आला.अद्यापही प्रशासन हालचाली करताना दिसत नाही. पावसाळा तोंडावर आला. मग शिल्लक राहणार्‍या ऊसाचं काय? जाधव कुटुंबियांना सरकारने पाच लक्ष रूपायाची मदत द्यावी.

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या नामदेव जाधव या तरूण शेतकर्‍याने आपला ऊस गेला नाही म्हणुन फडाला आग लावुन दिली. त्याच ठिकाणी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल. पण कितीही जीव गेले तरीही मायबाप सरकारला थोडाही पान्हा का फुटत नाही? असा प्रश्न पडतो. एक आत्महत्या सरकारी पातळीवर किंवा जिल्हा प्रशासनाने एवढी सहज का घ्यावी? आणि मग आता अशा प्रश्नावरून कितीही जीव गेले तरी कपाळकरंट्या सरकारला त्याचं काही वाटणारच नाही का? असा प्रश्न पडतो.

आत्महत्या झालेल्या कुटुंबियाला जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ भेट द्यायला हवी होती. एवढेच नव्हे तर सत्ताधार्‍यांनीही त्याची दखल घेवुन घटनेचं गांभीर्य ओळखायला हवं. पाच दिवस झाले जिल्हा प्रशासन जाग्यावर बसुन आहे. जिल्हाधिकारी मयताच्या घरी भेट द्यायला अद्याप गेलेले नाहीत. ही फार मोठी शोकांतिका बीड जिल्ह्यात सद्या म्हणावी लागेल. महाविकास आघाडीला मुळात शेतकर्‍यांच्या प्रश्नाचं कुठलंही गांभीर्य नाही. बीड जिल्ह्यात 20 टक्के शेतकर्‍यांचा ऊस शिल्लक आहे. ऊस तोड कामगार फडात काम करायला तयार नाही. बाहेरच्या कारखान्यावरून हार्वेस्टिंग आणावेत अशी मागणी वारंवार शेतकर्‍यांनी केली. भारतीय जनता पार्टीने पण केली.

मध्यंतरी येडेश्वरी कारखान्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते. त्यांनी भाषणात बोलताना हार्वेस्टिंग पाठवुन देवु केवळ आश्वासन दिलं. एकही मशिनरी प्रशासनामार्फत अद्याप जिल्ह्यात आली नाही. ठाकरे सरकारला एक आत्महत्या जिचं गांभीर्य कळतच नाही. खरं तर या कुटुंबियाला भेटण्यासाठी पालकमंत्री, महसुल मंत्री एवढेच नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यायला हवं. कारण कुठल्याही प्रश्नाचे गांभीर्य सुरूवातीला ओळखणं हे प्रशासनाचं आणि सत्ताधार्‍यांचं काम असतं. मात्र माय बाप सरकारच असंवेदनशील असेल तर अशा वेळी कितीही आत्महत्या ऊसाच्या फडात झाल्या तरी मग न्याय मिळू शकत नाही.

नामदेव जाधव या शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर बीड जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधव दु:खी झालेला आहे. त्या कुटुंबियाला पाच लाख रूपये प्रशासनाने तात्काळ मदत करावी आणि शेतकर्‍यांच्या प्रति आपल्या संवेदना दाखवाव्यात. पावसाळा तोंडावर आला कारखाने बंद होतील. शेतकर्‍यांचा ऊस गाळप होवुच शकत नाही. किमान एक लाख रूपये प्रति हेक्टरी शेतकर्‍यांना तात्काळ अनुदान द्यावे.

(राम कुलकर्णी भाजपाचे राज्य प्रवक्ते आहेत.)


Tags: BJPfarmersfarmers suicideNamdev JadhavRam KulkarniSugarCane FieldThackeray governmentनामदेव जाधवभाजपाराम कुलकर्णी
Previous Post

पाहिजे तसं काम नाही, रेल्वे अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती!

Next Post

पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

Next Post
113th anniversary of Pune Student House was celebrated with enthusiasm.

पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!