Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

May 14, 2022
in सरकारी बातम्या
0
113th anniversary of Pune Student House was celebrated with enthusiasm.

मुक्तपीठ टीम

वेदघोष, मंत्रपठण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार, पारितोषिक वितरण, सदिच्छा भेटी, स्नेहमेळावा अशा विविध कार्यक्रमांनी पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. दोन वर्षे कोरोनामुळे वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात येत होता. यंदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक दादासाहेब केतकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पूर्णिमा लिखिते यांच्यासह कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष एस. एम. जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक मंडळातील संजय गुंजाळ, रमेश कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुसकर, कृष्णाजी कुलकर्णी, दिनेश मिसाळ यांच्यासह सदानंद केंगे, एस. के. लिमये, अमरेंद्र गोरे, म. अ. जोशी आदी उपस्थित होते.
संस्थेच्या आवारातील राम-लक्ष्मण मंदिरात कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी रमेशचंद्र कुलकर्णी (वय ८४) यांचे ‘पत्रसंवाद भाग १ व २’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. पुस्तक विक्रीच्या रकमेतून एक लाख रुपयाची देणगी कुलकर्णी यांनी संस्थेला दिली. समितीचे हितचिंतक डॉ. सतीश देसाई, शामकांत देशमुख, अनुसंधान समितीचे हणमंत भोसले, कृष्णाजी शिरकांडे आदी उपस्थित होते.

माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ‘मला संस्थेने काय दिले’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. वर्षभराचा आलेख मांडत कार्याचा आढावा घेण्यात आला.

कोरोना काळात विविध विभागातील निवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळच्या सोहळ्याची सुरुवात पाच ब्राह्मणांच्या मंत्रघोषात झाली. संस्थेच्या सर्व शाखांतील पदाधिकारी, कर्मचारी, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सदिच्छा भेटीसह पानसुपारीचा कार्यक्रम झाला.


Tags: ११३ वा वर्धापनदिनpunePune Student Homeपुणे विद्यार्थी गृह
Previous Post

“ऊसाच्या फडाला आग लावून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याला ठाकरे सरकारकडून एक रूपयाचीही मदत नाही!”

Next Post

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखाचे अनुदान द्यावे

Next Post
Prathmesh Abnave

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखाचे अनुदान द्यावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!