Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मविआचं सरकार पडतंय त्याचं दु:ख नाही! पण भाजपावरही अशीच वेळ येईल!! – राजू शेट्टी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. जवळपास ४० हून अधिक आमदारांसोबत शिंदे हे आसाममधील गुवाहटीमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही असं म्हणत भाजपावरही निशाणा साधला आहे.

भाजपावर ही अशी वेळ येईल!!

  • ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात.
  • ही प्रवृत्ती वेगानं वाढत आहे.
  • देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे.
  • आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा काळाची पावले ओळखा.
  • एखादा पक्ष किंवा संघटना उभा करण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे ज्याचं त्यालाच माहित आहे.
  • अशा पद्धतीनं एखाद्या पक्षाची वाताहत होतेय त्यामुळं वाईट वाटत आहे.

राजू शेट्टींचा भाजपावर आरोप!!

  • भाजपाकडे असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
  • भाजपा ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे.
  • तसेच महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही.
  • कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे.
  • कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं आहे.

राजू शेट्टींनी आघाडीतून का बाहेर पडले ?

  • राजू शेट्टी एप्रिल महिन्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडले.
  • महापूरग्रस्तांना मदत, शेतकऱ्यांना मदत त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावा यासाठी राजू शेट्टींचा संघर्ष होता मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं.
  • याशिवाय भूमीअधिग्रहन कायदा, एफआरपी दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय हे महाविकास आघाडी सरकारने घेतले. हे निर्णय शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना ते पटलं नाही आणि अखेर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
  • शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर आम्ही आमची भूमिका घेऊन इथून पुढे वाटचाल करणार आहोत असा निर्णय कुठेतरी घ्यावा लागेल.
  • मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो की, महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे सर्व संबंध संपले आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले.

Tags: Eknath ShindeMaharashtraMaharashtra Political CrisisMva govtRaju shettiShivsenaभाजपामविआराजू शेट्टी
Previous Post

थेट आसामात एकनाथ शिंदेंविरोधात निदर्शने! सातारच्या शिवसैनिक पोलिसांनी ताब्यात घेतले!!

Next Post

बंडखोरीनंतर राजकीय पक्ष कुणाचा होतो? वाचा गेल्या ६ वर्षातील २ फुटीच्या गोष्टी…

Next Post
Chirag Paswan Uddhav Thackeray And Akhilesh yadav

बंडखोरीनंतर राजकीय पक्ष कुणाचा होतो? वाचा गेल्या ६ वर्षातील २ फुटीच्या गोष्टी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!