मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. जवळपास ४० हून अधिक आमदारांसोबत शिंदे हे आसाममधील गुवाहटीमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही असं म्हणत भाजपावरही निशाणा साधला आहे.
भाजपावर ही अशी वेळ येईल!!
- ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात.
- ही प्रवृत्ती वेगानं वाढत आहे.
- देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे.
- आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा काळाची पावले ओळखा.
- एखादा पक्ष किंवा संघटना उभा करण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे ज्याचं त्यालाच माहित आहे.
- अशा पद्धतीनं एखाद्या पक्षाची वाताहत होतेय त्यामुळं वाईट वाटत आहे.
राजू शेट्टींचा भाजपावर आरोप!!
- भाजपाकडे असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
- भाजपा ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे.
- तसेच महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही.
- कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे.
- कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं आहे.
राजू शेट्टींनी आघाडीतून का बाहेर पडले ?
- राजू शेट्टी एप्रिल महिन्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडले.
- महापूरग्रस्तांना मदत, शेतकऱ्यांना मदत त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावा यासाठी राजू शेट्टींचा संघर्ष होता मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं.
- याशिवाय भूमीअधिग्रहन कायदा, एफआरपी दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय हे महाविकास आघाडी सरकारने घेतले. हे निर्णय शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना ते पटलं नाही आणि अखेर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
- शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर आम्ही आमची भूमिका घेऊन इथून पुढे वाटचाल करणार आहोत असा निर्णय कुठेतरी घ्यावा लागेल.
- मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो की, महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे सर्व संबंध संपले आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले.