Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन

January 12, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत’

मुक्तपीठ टीम 

 

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विनम्र अभिवादन केले. जिजाऊ माँसाहेब या आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत असल्याचे मुख्यमंत्री यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटले आहे की, “संकट काळात न डगमगता धैर्य आणि शौर्याने पुढे जाण्याची प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वाभिमान जपण्याचा आणि दुर्बल, वंचितांच्या रक्षणाचा मुलमंत्र दिला. रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी त्यांनी मुत्सद्दीपणा आणि धीरोदात्तपणे पावले टाकली. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही जिजाऊ माँसाहेब यांचा करारी बाणा आणि धडाडी प्रेरणादायी अशीच आहे. प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत, वंदनीय राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.”

 

राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती

“जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल” – उपमुख्यमंत्री अजित पवार

“स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. माँसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचे बळ दिले. जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. प्रत्येक आव्हानावर मात करण्याचे बळ माँसाहेबांच्या संस्कारी विचारातच आहे,” अशा शब्दात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंती निमित्त अभिवादन केले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, “शेकडो वर्षांच्या गुलमागिरीच्या जोखडातून मुक्ततेची वाट राजमाता माँ जिजाऊंनी महाराष्ट्राला दाखविली. त्यांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे-रयतेचे स्वराज्य स्थापन केले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. जिजाऊ माँसाहेबांचे विचार, संस्कार आपल्याला कायमच लढण्याची प्रेरणा आणि बळ देत राहतील. राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मोठ्या शौर्याने, ध्यैर्याने, संयमाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात आपला महाराष्ट्र आज आघाडीवर दिसतो, याचे मूळ जिजाऊ माँसाहेबांनी रुजविलेल्या स्वाभिमानाच्या विचारात आणि राष्ट्रासाठी त्यागाच्या संस्कारात आहे.”


Tags: ajit pawarchief minister of maharashtrachief minister uddhav thackeraycm uddhav thackeraymuktpeethNCPShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेमुक्तपीठमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराष्ट्रवादी कॉंग्रेसशिवसेना
Previous Post

शेतकरी आंदोलनासाठीच्या समितीतील चौघे आहेत कोण? आणि कसे? 

Next Post

“ज्यांनी कायद्यांचे समर्थन केले त्यांचीच समिती न्यायालयाला काय वेगळे सांगणार?”

Next Post
Raju-Shetti

"ज्यांनी कायद्यांचे समर्थन केले त्यांचीच समिती न्यायालयाला काय वेगळे सांगणार?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!