Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आईंना कोरोना, सौम्य लक्षणांमुळे घरीच उपचार

मनसेचे मुंबई, पुण्यातील मेळावे रद्द

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांचे मुंबईतील भांडुप आणि पुणे येथील मनसेचे मेळावे रद्द करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे ही सौम्य आहेत. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे. सध्या दोघांवरही ठाकरे यांच्या कृष्णकुंज या राहत्या घरी उपचार सुरु आहेत.

 

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सक्रिय झाली आहे. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक, पुणे दौरा करून पक्षातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. २३ ऑक्टोबरला मनसेचा मुंबईत आणि २४ ऑक्टोबरला पुण्यात मेळावा होणार होता मात्र तो अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. आता मात्र राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

मनसेच्या ट्विटर हँडलवरून दिली माहिती

  • मनसेच्या ट्विटर हँडलवरून मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार २३ ऑक्टोबर रोजी मुंबईत, तर २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
  • पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मनसेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
    मात्र, मेळावा रद्द करण्याचं कारण देण्यात आलेलं नाही.
  • मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात आला आहे.

राज यांची तब्येत बिघडली

  • २३ ऑक्टोबर रोजी भांडूप येथे हा मेळावा होणार होता.
  • या मेळावाच्या आयोजनाबाबत आज मनसे मुख्यालय राजगड येथे बैठक फार पडली होती.
  • यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली होती.
  • या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
  • या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या रडारवर कोण असेल याबाबतही सर्वांची उत्सुकता लागली होती.
  • दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याचं कळतं.
  • त्यामुळेच उद्या आणि परवा होणारे मेळावे रद्द करण्यात आले आहेत.
  • संध्याकाळी उशिरा मनसेच्या गोटातून राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले.

Tags: mansemumbaiRaj Thackerayमनपा निवडणुकामनसेमुंबईराज ठाकरे
Previous Post

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये १८३ जागांवर नोकरीची संधी

Next Post

“पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न व्हावा”: आदित्य ठाकरे

Next Post
eco friendly

"पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न व्हावा": आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!