Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! सरकारच्या अधिकृत कोरोना अ‍ॅपआधीच फेक अ‍ॅपचा संसर्ग!

January 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
Co-win App

कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालय को-विन (Co-WIN) अ‍ॅप लॉन्च करणार आहे. पण हे अ‍ॅप्स ऑफिशिअल लॉन्च होण्याआधीच प्ले स्टोरवर ‘Co-WIN’ नावाचे अनेक बनावट अ‍ॅप्स दिसत आहेत.

 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, गूगल प्लेस्टोअरवर को-विन अ‍ॅप डाउनलोड करू नका. या बनावट अ‍ॅप्समुळे आपली वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. सोशल मीडियावर ते म्हणाले की, सरकारने अद्याप अधिकृत को-विन अ‍ॅप सुरू केलेला नाही. त्यामुळे या नावाचे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करु नका. अ‍ॅप सुरू करताना त्याची माहिती दिली जाईल.

 

‘को-विन’ अ‍ॅप आहे तरी कसे?

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी को-विन अ‍ॅप तयार केला आहे. यामुळे लस वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी मदत होईल. अ‍ॅपच्या माध्यमातून सरकारला लसीकरण झालेल्या लोकांची माहिती ठेवण्यासाठी सोईचे जाईल. या अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतरच लोकांना लस दिली जाईल.

 

‘Co-WIN’ (कोविड -१९ व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क) ही ‘eVIN’ (इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क) ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. अ‍ॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर ते गुगल प्लेस्टोअर आणि अ‍ॅपल प्लेस्टोअरवरील वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केले जाईल.

 

लसीची माहिती लोकांना देण्यासाठी १२ भाषांमध्ये एसएमएस पाठविला जाईल. लस घेतल्यानंतर एक क्यूआर कोड प्रमाणपत्र दिले जाईल जे आपल्याला मोबाईलमध्ये ठेवता येईल. क्यूआर कोड प्रमाणपत्रे संचयित करण्यासाठी सरकारचे स्टोरेज अॅप ‘डिजीलोकर’या मध्ये सर्व माहिती एकत्रित असेल. यासह २४×७ सुविधा देखील उपलब्ध होतील.

 

३ टप्प्यात लसीकरण केले जाईल

 

आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की, “कोरोना लस ३ टप्प्यात दिली जाईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्व फ्रंटलाइन हेल्थकेअर व्यावसायिकांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात आपत्कालीन सेवांशी जोडलेले लोक असतीत. अखेरीस गंभीर परिस्थिती असलेल्या लोकांना लस दिली जाईल.”


Tags: Co-win AppElectronic Vaccine Intelligence NetworkeVINGoogle Play Storeकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनको-विन अॅपकोविड -१९
Previous Post

रेल्वेच्या चीफ बुकींग सुपरवायझरची आत्महत्येने खळबळ

Next Post

घरफोडीप्रकरणी चार आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक

Next Post
thief housebreaking

घरफोडीप्रकरणी चार आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!