Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बार्टीचे नऊ विद्यार्थी यावर्षी यूपीएससी परीक्षेत यशस्वी!

बार्टीकडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन     

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020

मुक्तपीठ टीम

लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. दिल्ली येथील नामांकित संस्था, यशदा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना पूर्व तथा मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते तसेच नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीकरीता व व्यक्तिमत्व परीक्षेच्या तयारीकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते. कोरोना महामारीच्या संकटात सुद्धा महासंचालक श्री. गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीने व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच महासंचालक श्री. गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले होते. बार्टी संस्था युट्यूबद्वारे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देत आहे. तसेच यूपीएससी मुलाखतीचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देणारी बार्टी ही राज्यातील एकमेव संस्था आहे.

 

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मधील यशस्वी विद्यार्थी

यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बार्टीच्यावतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  मंत्री श्री. मुंडे, महासंचालक श्री. गजभिये यांनी अभिनंदन केले आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत कार्य उत्तीर्ण अधिकाऱ्याने करावे. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी आपण कार्य करावे आपण यशस्वी झालात बार्टी संस्थेला आपला अभिमान वाटत आहे, अशा शुभेच्छा महासंचालक श्री. गजभिये यांनी यावेळी दिल्या. बार्टी संस्थेच्यावतीने येरवडा संकुल येथे अद्ययावत यूपीएससी स्पर्धा परीक्षेचे निवासी केंद्र लवकरच सुरु करणार असल्याची माहिती महासंचालक श्री. गजभिये यांनी यावेळी दिली.

 

यशस्वी विद्यार्थ्यांनी बार्टीने केलेल्या सहकार्यामुळे आज आम्ही यशस्वी झालो असल्याचे सांगून बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. गजभिये यांचे आभार व्यक्त केले आहे. रुपेश शेवाळे व मुकुल कुलकर्णी (आयआरएस) यांनी आपला अमूल्य वेळ काढून बार्टीतील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रिया पवार यांनी ऑनलाइन मुलाखतीचे आयोजन व नियोजन  यशस्वीरीत्या केले त्यांचेही श्री. गजभिये यांनी अभिनंदन केले.


Tags: bartimuktpeethstudentsUPSCupsc examबार्टीयूपीएससीयूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020
Previous Post

हेतल पगारेची IAS होण्याची कडवी जिद्द! दिवसाचे १८ तास अभ्यास!! यशानंतरही करणार पुन्हा प्रयत्न!

Next Post

नक्षलवादविरोधी बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत, पण गृहमंत्री अमित शाहंसह आजी-माजी-भावींचे सहभोजनच चर्चेत!

Next Post
cm nd shah

नक्षलवादविरोधी बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत, पण गृहमंत्री अमित शाहंसह आजी-माजी-भावींचे सहभोजनच चर्चेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!