राही भिडे
नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही चांगले यश प्राप्त केले आहे. हेतल पगारे या विद्यार्थींनीने यूपीएससीमध्ये ६३० रँकिंग मिळविले आहे. यामुळे हेतलचं सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.
हेतल यूपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती अतिशय दृढ, अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थी आहे. ती तिच्या खोलीत १८ तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास करायची. मला वाटते की, ती तिच्या वडिलांपासून प्रेरणा घेते जे आयएएस आहेत. तिला तिच्या वडिलांप्रमाणे आयएएस अधिकारी व्हायचे आहे. यामुळे ती थोडी चिंतेत आहे. तिला २०० च्या आत रँक मिळवण्याचा पूर्ण विश्वास होता. पण मी तिच्या आत्मविश्वास आणि प्रयत्नांचे कौतुक करते.
हेतलचे आईृवडिल हेतलच्या या यशामुळे खुप खुश आहेत. हेतलचे वडील कैलास पगारे हे आता फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तिची आई वंदना पगारे गृहिणी आहे. हेतलसाठी तिची आईही तिची आदर्श आहे. आईने हेतलला खुप पाठींबा दिला. तिची आई एक अतिशय शिस्तबद्ध स्त्री आहे आणि तिची दोन्ही मुले हेतल आणि अनुराग देखील पालकांप्रमाणे मोठी झाली पाहिजेत अशी तिची इच्छा आहे.
डी आयएएस बस चुकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा डी परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. विद्यार्थ्यांना आयएएस का व्हायचे आहे? त्यांना नेहमी लोकांसोबत राहायचे आहे, त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, सामान्य जनतेच्या भल्यासाठी धोरण आखायचे आहे. विशेषतः लोकांसाठी आणि सामान्यपणे आपल्या राज्याच्या विकासासाठी ही दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांचे मी कौतुक करते. ऑल द बेस्ट हेतल, तुझा अभिमान आहे!
हेतल पगारे ही एक शिस्तबद्ध आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. तिने आपलं शिक्षण सिव्हिल इजिनिअरिंगमध्ये पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड येथे केले आहे. तिने याआधी एमपीएससी दिली आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तिला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालं.
हेतलला तिच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. तिचे वडिल हे आयएएस आहेत. लहानपणापासून घरात तसं वातावरण असल्याने तिने लहानपणीचं आयएएसचं स्वप्न पाहिलं. यानंतर तिला यूपीएससीमध्ये ६३० रँकिंग मिळणून ती उत्तीर्ण झाली. तिला आयआरएस एका महिन्याने मिळणार आहे. मात्र पुढे तिचं स्वप्न हे आयएएस अधिकारी होण्याचं आहे. म्हणून ती पुढे आणखी प्रयत्न करणार आहे.