Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

May 27, 2022
in घडलं-बिघडलं
0
Fake Payment Scam

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र वस्तू सेवाकर विभागाने जवळपास ६० कोटींच्या बनावट खरेदी व विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून शासनाची १०.४२ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या पुण्यातील एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. वस्तू व सेवाकर विभागाकडे उपलब्ध बीफा (BIFA), प्राईम, ई वे बिल पोर्टल अशा विविध विश्लेषण प्रणालीच्या आधारे करून या करचोरीचा शोध घेण्यात आला, अशी माहिती अपर राज्य कर आयुक्त कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मे. अयान ट्रेडर्स या व्यापाऱ्याच्या विरोधात शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस देयका संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत इरफान इस्माईल शेख यांना २५ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.

मुख्य न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी सदर व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई पुण्याच्या राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर व राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त (अन्वेषण) चंदर कांबळे, प्रणाली आवटी पाटील, बाबासाहेब जुंबड, ऋषिकेश अहिवळे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली.

संपूर्ण कारवाई दरम्यान पुणे क्षेत्रचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, यांचे मार्गदर्शन मिळाले.

सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत १५ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे.


Tags: 60 CrFake Payment scamIrfan Ismail ShaikhM Ayan TradersMaharashtra Goods And Service Taxइरफान इस्माईल शेखमे. अयान ट्रेडर्सवस्तू व सेवाकर विभाग
Previous Post

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर करण्यात आली ती ‘अँजिओप्लास्टी’ असते कशी?

Next Post

रिसॉर्ट सुरु नाही, तरीही सांडपाणी समुद्रात गेल्याची तक्रार…ईडी चौकशीनंतर अनिल परबांचा आक्षेप!

Next Post
anil parab

रिसॉर्ट सुरु नाही, तरीही सांडपाणी समुद्रात गेल्याची तक्रार...ईडी चौकशीनंतर अनिल परबांचा आक्षेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!