Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – सुभाष देसाई

June 28, 2022
in घडलं-बिघडलं
0
महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणा-या ग्रंथांचे प्रकाशन 2 (1)

मुक्तपीठ टीम

मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेला प्रयत्न, मराठी भाषा अनिवार्य करण्याचा आणि दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून असाव्यात यासाठी केलेला  कायदा, अशा प्रकारचे मराठी भाषेसाठी भरीव काम करता आले याचा आनंद आहे. ‘ग्रंथाली’ व ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणा-या ग्रंथांचे प्रकाशन 3

मराठी भाषा, साहित्य-संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रांत गेल्या सहा दशकांत काय प्रगती झाली, काय राहिले याची वस्तुनिष्ठ नोंद घेणारे तीन खंडांची ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने निर्मिती केली आहे. या  खंडांचे आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा जगभरात ८० देशांत बोलली जाते. मराठीच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंच आणि प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक पुरावे केंद्राला सादर केले. केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्तीशः याचा पाठपुरावा केला आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण आणि शासनाच्या कामकाजात मराठी भाषेतून व्यवहार करणे अनिवार्य केले आहे. सर्व मंडळांच्या शाळेतून मराठी विषय शिकविणे सक्तीचे केले आहे.             

राज्यात एक मोठी गुंतवणूक प्रस्तावित असून त्यासाठी नुकतेच दिल्ली येथे बैठकीला उपस्थित राहून याबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री म्हणून राज्यातील मोठ्या तसेच लहान उद्योगांच्या विकासासाठी पोषक असे वातावरण तयार केले. राज्यात प्रस्थापित जुन्या उद्योगांच्या वाढीसह नविन ८६ हजार स्टार्टअप्सने राज्यात सुरुवात केली आहे. शंभर युनिकॉर्न कंपन्यांमधे  किमान २५ कंपन्या या मुंबई-पुण्यातल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी लिस्टींग करता यावे, यासाठी एस एम ई  प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्यानंतर जवळपास ४०० लघु उद्योगांनी शेअर बाजाराच्या माध्यमातून १५  हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे, असेही सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

भाषेचे सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी माध्यमांची – राजीव खांडेकर

महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणा-या ग्रंथांचे प्रकाशन 1

भाषा जगवणे हे काम माध्यमांचे नाही, मात्र भाषेचे सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी माध्यमांनी सांभाळावी, अशी अपेक्षा वृत्त वाहिनी चे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मराठीचा प्रवाह हा आकुंचन पावणार नाही यासाठी अनेक ठिकाणी काही लोक तन्मयतेने मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य करीत आहेत त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे.

नव्या पिढीला राज्यातील गौरवशाली कामगिरीची ओळख करुन देण्याचे काम या ग्रंथांच्या माध्यमातून होणार असल्याची भावना डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. चांगल्या प्रयत्नांना कायम साथ देण्याचे आश्वासनही श्री. पाटील यांनी दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी केवळ तळमळ असून चालत नाही, त्यासाठी दूरदृष्टी देखील असावी  लागते. ती ग्रंथालीच्या विश्वस्थांकडे आहे, म्हणूनच हे ग्रंथ निर्मितीचे काम पूर्ण होऊ शकले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक अरुण शेवते यांनी काढले.

महाराष्ट्राच्या जडण घडणीचा दस्तावेज

‘विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र’ या ग्रंथाचे संपादन विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान यांनी केले. यात ३६ विचारवंताचा समावेश आहे.  ‘मोहरा महाराष्ट्राचा’ याचे संपादन रमेश अंधारे यांनी केले आहे. यात ४३ अभ्यासकांचा सहभाग आहे.  ‘मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान’ याचे संपादक म्हणून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. अजय देशपांडे यांनी काम पाहिले आहे. हे तीन महत्त्वपूर्ण खंड म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीचा दस्तऐवज आहेत. वाचक, अभ्यासकांसाठी पथदर्शी असणारा हा ऐवज संग्रही असावा, असा आहे. मूळ ३,००० /- रुपयांचा तीन खंडांचा संच ‘ग्रंथाली’ने केवळ १,५०० /- रुपयांत उपलब्ध केला आहे, असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी ३ खंडांनिमित्त ग्रंथालीच्या गेल्या दोन वर्षातील निवडक ६० पुस्तकांचा संच, तीन खंड आणि ‘शब्द रूची‘ या मासिकाचे तीन वर्षाचे तीन वर्ष अंक घरपोच केवळ ८,५००/- रुपयांत मिळणार असल्याची माहिती  श्री. हिंगलासपूरकर यांनी यावेळी दिली. ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


Tags: GranthalimarathiShubhash Desaiग्रंथालीमराठीमराठी भाषा विभागसुभाष देसाई
Previous Post

सोनिया गांधींच्या ७१ वर्षांच्या पीएवर २६ वर्षांच्या तरुणीचा बलात्काराचा आरोप!

Next Post

मुलगी मैत्रीपूर्ण वागली म्हणजे शरीरसंबंधासाठी होकार नाही! न्यायालयानं फटकारलं!!

Next Post
high court mumbai

मुलगी मैत्रीपूर्ण वागली म्हणजे शरीरसंबंधासाठी होकार नाही! न्यायालयानं फटकारलं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!