Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनिया गांधींच्या ७१ वर्षांच्या पीएवर २६ वर्षांच्या तरुणीचा बलात्काराचा आरोप!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
delhi police

मुक्तपीठ टीम

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे ७१ वर्षांचे पीए पीपी माधवन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुण महिलेच्या बलात्कार आणि धमकावण्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २६ वर्षीय महिलेने ही तक्रार दाखल केली. माधवन यांनी नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. माधवन यांनी त्यांच्यावरील आरोप हे राजकीय कटकारस्थानाचा भाग असल्याचा दावा केला आहे.

काय आहेत पीडितेचे आरोप?

  • पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पीडितेने सांगितले की, आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि या प्रकरणाची तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.
  • पीडितेच्या तक्रारीवरून माधवनविरुद्ध उत्तम नगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • जिल्हा पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
  • जीवाला धोका असल्याचे कारण देत पीडितेने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

माधवन यांच्याविरोधातील आरोपांचा घटनाक्रम

  • पीडित महिला उत्तम नगर परिसरात राहते.
  • तिचा नवरा काँग्रेसचा कार्यकर्ता होता, तो होर्डिंग-बॅनर लावायचा.
  • यामुळे ती काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आल्या आणि पक्षाच्या कार्यालयात आणि कार्यक्रमांना भेटी देऊ लागल्या.
  • २०२० मध्ये तिच्या पतीचे निधन झाले, पतीच्या मृत्यूमुळे तिचे हाल झाले.
  • जेव्हा ती पक्षाच्या कार्यालयात मदतीसाठी गेली तेव्हा तिथल्या एका कार्यकर्त्याने तिला सोनिया गांधींचे पीए पीपी माधवन यांचा मोबाइल नंबर दिला.
  • फोनवरून तिने माधवनला तिची आर्थिक परिस्थिती सांगितली आणि काम मिळवून देण्याची विनंती केली.
  • यानंतर माधवन आणि महिलेमध्ये वारंवार बोलणे सुरू झाले.
  • २१ जानेवारी २०२२ रोजी, माधवनने तिला नोकरीसाठी मुलाखत देण्याविषयी बोलले आणि पीडितेला सांगितले की त्याची पत्नी मरण पावली आहे.
  • ते सध्या एकटे आहेत आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. यानंतर दोघांमधील जवळीक आणखी वाढली.
  • एके दिवशी माधवन यांनी तिला उत्तम नगरला रात्री भेटण्यासाठी बोलावले.
  • सुरुवातीला महिलेने नकार दिला, पण आग्रह धरला.
  • आरोपीने महिलेला कारमध्ये बसवले आणि त्याच्या ड्रायव्हरला गाडीतून उतरवले.
  • यानंतर त्याने तिच्यासोबत गलिच्छ काम केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

माधवन यांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप

  • पीडित महिलेच्या आरोपांनुसार त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
  • फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपीने पीडितेला सुंदरनगर येथील घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
  • त्यावेळी त्यांची पत्नी जिवंत असल्याचे पीडितेला समजले. पीडितेने माधवनला विचारणा केली असता ते कारणं देऊ लागले. यानंतर त्याने
  • पीडितेला काही पैशांचे आमिष दाखवून गप्प बसण्यास सांगितले.
  • नाही तर पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.

Tags: CongressLaw-PoliceMuktapeethPA PP MadhavanRape CrimeSonia Gandhi PAकायदा पोलीसकॉंग्रेसघडलं-बिघडलंपीए पीपी माधवनबलात्कार गुन्हामुक्तपीठसोनिया गांधी पीए
Previous Post

यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार

Next Post

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – सुभाष देसाई

Next Post
महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणा-या ग्रंथांचे प्रकाशन 2 (1)

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद - सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!