मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, त्याची माहिती एकत्र देण्याचा प्रयत्न:
कोरोना लाट ओसरल्यानंतर आता अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येत असताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वाधिक महत्व हे शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी विकासाची पंचसूत्रीचा उल्लेख केला आहे.
- कोरोना संकटावर मात करत पुढे जात असताना महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प सादर झाला आहे.
- या अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बुस्टर डोस मिळाला आहे.
- यात निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास आहे.
- हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताची जोपासना करणारा आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
शेती
- नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी १० हजार कोटींची तरतुद
- महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार
- महिला शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजार अनुदान देणार
- या अनुदानाचा लाभ अंदाजे २० लाख शेतकरी बांधवांना होईल.
- त्यासाठी सन २०२२-२३ मध्ये १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
भूविकास बँकेच्या ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी
- भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रूपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाख रुपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरविले आहे.
- भूविकास बँकांच्या जमिनी व इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
वेगळ्या पीक विमा योजनेची शक्यता
- गुजरात व अन्य काही राज्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून यापूर्वीच बाहेर पडली आहेत. महाविकास आघाडी शासनाने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून या योजनेमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.
- ती मान्य झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र सरकारही अन्य पर्यायांचा विचार केला जाईल.
शेतीसंबंधित महत्वाच्या तरतुदी
- मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
- कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी
- अन्न प्रक्रिया योजना वाढवणार
शेतीसाठी पाणी-वीज
- या वर्षात ६० हजार कृषी वीज पंपाना वीज देणार
- २ वर्षात अपूर्ण सिंचन पूर्ण करणार
- जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटी
- २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
- पणन विभागाला अधिक निधी
- पशूधनासाठी ३ फिरत्या प्रयोगशाळा उभारणार
आरोग्य
- पुणे शहरात ३०० एकरात इंद्रायणी मेडिसीटी उभारणार
- मोतीबिंदू शस्त्रक्रियेस अत्याधुनिक सुविधा
रोजगार – शिक्षण
- स्टार्टअपसाठी तरुणांना विशेष निधी
- प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्न करणार
- उच्च तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार ६१९ कोटींची तरतूद
- शालेय शिक्षणासाठी २ हजार ३५४ कोटी
क्रीडा
- क्रीडा विभागाला २८५ कोटींचा निधी
स्मारकं
- मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी
- थोर समाजसुधारकाच्या नावे अध्यापन केंद्र सुरु करणार
- हवेलीमध्ये संभाजीराजे यांचे स्मारक उभे करणार, २५० कोटी खर्च करणार
मुंबई
- नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा वापरणार
- मुंबईतील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा विकास
कोणत्या विभागासाठी कितीची तरतुद?
- जलसंपदा : १३ हजार २५२ कोटी
- बांधकाम : १५ हजार ६७३ कोटी
- आरोग्य : ११ हजार कोटी
- ऊर्जा : ९ हजार ९२६ कोटी
- नगर विकास : ८ हजार ८४१ कोटी
- परिवहन : ३ हजार ३ कोटी
- सामाजिक न्याय : २ हजार ८७६ कोटी
- महिला व बाल विकास : २ हजार ४७२ कोटी
- शालेय शिक्षण : २ हजार ३५४ कोटी
- गृह : १ हजार ८९६ कोटी
- पर्यटन : १ हजार ७०४ कोटी
- उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण : १ हजार ६९९ कोटी