Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमआयडीसी सरळसेवा भरतीत ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान

June 17, 2022
in करिअर, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान 2

मुक्तपीठ टीम

 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते.

महामंडळातील सरळसेवेची वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ११ संवर्गातील ५०२ पदांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यातील पाच जणांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान 1

दरम्यान, या परीक्षेत कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्यालयीन स्तरावरून समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, शासनाद्वारे राबविलेली सर्वाधिक पारदर्शक नोकरभरती असल्याचे समाधान मंत्री श्री.देसाई यांनी व्यक्त केले.


Tags: Appointment LettercareerCorporate SaralsevaMaharashtra Industrial Development CorporationMIDCmuktpeethउद्योगमंत्री सुभाष देसाईएमआयडीसीएमआयडीसी सरळसेवा भरतीकरिअरनियुक्तीपत्रमहामंडळातील सरळसेवामहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमुक्तपीठ
Previous Post

मनसेचं लक्ष्य शिवसेनेचं बळ असणारी स्थानिक मंडळं!

Next Post

जगात अन्नाच्या नासाडीत भारत नंबर २! अख्ख्या ऑस्ट्रेलियाचं पोट भरेल एवढा गहू भारतात वाया!!

Next Post
Food wastage

जगात अन्नाच्या नासाडीत भारत नंबर २! अख्ख्या ऑस्ट्रेलियाचं पोट भरेल एवढा गहू भारतात वाया!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!