Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसेचं लक्ष्य शिवसेनेचं बळ असणारी स्थानिक मंडळं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. आता मनसेनेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ कलमी कार्यक्रम तयार केला आहे. सर्व विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना तो राबवण्याची सूचना दिली आहे. याअंतर्गत गणेशोस्तव, नवरात्रोत्सव मंडळे आणि गोविंदा पथकांची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आल्याचे कळते. विशेष म्हणजे यातील बहुतांश मंडळं शिवसेनेच्या प्रभावाखालील मानली जातात. त्यामुळे मनसेने शिवसेनेचं बळ असणारी स्थानिक मंडळं लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सक्रीय!

  • मनसेने विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना विभागात २९ कलमी कार्यक्रम राबवा.
  • मनसेच्या स्थानिक शाखेतील रिक्त पदे तातडीने भरा.
  • इतर पक्षांतील अंतर्गत माहिती गोळा करा.
  • मनसेचे विचार, कार्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया टीम सक्रीय करा.

शिवसेनेच्या प्रभावाखालील स्थानिक मंडळांवर मनसेचा डोळा

  • आगामी निवडणुका लक्षात घेता गणशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे आणि गोविंदा पथकांची माहिती गोळा करा.
  • या मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क वाढवा.
  • त्यांचा विभागातील लोकांवरील प्रभावाची माहिती घ्या.
  • परिसरातील जैन, बौद्ध या धर्मांच्या संस्था, पदाधिकाऱ्यांशीही संपर्क वाढवा.
  • त्यांच्यातील समाजात प्रभावशाली लोकांची माहिती घ्या.

मनसेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करा!

  • मनसेचे संघटनात्मक बळ वाढवा.
  • नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीनुसार संभाव्य उमेदवारांची माहिती गोळा करा.
  • प्रभागांच्या पुनर्रचनेनुसार पदाधिकारी नेमा.
  • इतर पक्षातील इच्छुकांचा ताबडतोब पक्षात घ्या.
  • अन्य पक्षांतील नाराजांना मनसेकडे वळवा.
  • पक्षात तरुण नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी लक्ष केंद्रित करा.

नगरसेवकांच्या कामांची झाडाझडती घ्या!

  • गेल्या निवडणुकीत तुमच्या विभागातून निवडून गेलेल्या नगरसेवकांनी दिलेली आश्वासनं, न केलेली कामे यांची माहिती घ्या.
  • प्रभागातील प्रतिष्ठित, सुशिक्षितांमधील संभाव्य उमेदवारांची माहिती मिळवा.
  • तसेच सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे.
  • त्यामुळे अशा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags: BMCLocal committeesmnsShivsenaमनसेमुंबई महानगरपालिकाशिवसेना
Previous Post

मुंबईतील गेटवे, माहिम किल्ला आणि ऑगस्ट क्रांती मैदानात सौंदर्यीकरणासह सुविधा पुरवणार

Next Post

एमआयडीसी सरळसेवा भरतीत ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान

Next Post
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान 2

एमआयडीसी सरळसेवा भरतीत ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!