Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रथमेश आबनावे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जाहीर सत्कार

March 13, 2022
in घडलं-बिघडलं
0
Satkar - Kapote, Joshi, Abnave, Pushkar, Khore (1)

मुक्तपीठ टीम

अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीने घेतलेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी प्रथमेश विकास आबनावे यांची ६३७७ एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने निवड झाली आहे. आबनावे महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे खजिनदार आणि संचालक असून, या निवडीबद्दल महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संस्थेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे मानद अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते फुले पगडी, शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन प्रथमेश आबनावे यांचा सत्कार झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पीएमटीचे माजी चेअरमन चंद्रशेखर कपोते, पत्रकार राजेंद्र पंढरपुरे, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सहसचिव पुष्कर प्रसाद आबनावे, प्रज्योत आबनावे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक कार्यकारिणीसाठी महाराष्ट्रातून निवडलेल्या ४५ जणांच्या कार्यकारिणीत प्रथमेश आबनावे यांनी स्थान मिळवले आहे. चार पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या आबनावे कुटुंबातील प्रथमेश आबनावे यांनी प्रथमच निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. प्रथमेश यांचे वडील डॉ. विकास आबनावे पुणे शहर काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.
प्रथमेश विकास आबनावे यांनी आपली ही निवड वडील दिवंगत डॉ. विकास मारुतराव आबनावे यांना समर्पित करत श्रद्धांजली वाहिली. मोहन जोशी यांनी या निवडणुकीची प्रक्रिया व या कार्यकारिणीत पद मिळण्याचे महत्व सांगितले. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
“गांधी विचारांवर आधारित काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे विचार, दृष्टीकोन समाजातील सर्वच स्तरांत पोहचवण्यासाठी, पक्ष संघठन मजबूत करण्यासाठी आणि तरुणांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी काम करणार आहे.”
Prathmesh Abnave
(-प्रथमेश विकास आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)

Tags: CongressMaharashtra Pradesh Youth CongressPrathamesh Vikas abnaveकाँग्रेसप्रथमेश विकास आबनावेमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
Previous Post

शरद पवारांविरोधात वादग्रस्त वक्तव्य, नितेश आणि निलेश राणेंविरोधात गुन्हा!

Next Post

देवेंद्र फडणवीसांची पोलिसांकडून चौकशी, भाजपाचा संताप! समजून घ्या काय आहे प्रकरण…

Next Post
Rashmi Shukla And devendra fadnavis

देवेंद्र फडणवीसांची पोलिसांकडून चौकशी, भाजपाचा संताप! समजून घ्या काय आहे प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!