Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांविरोधात वादग्रस्त वक्तव्य, नितेश आणि निलेश राणेंविरोधात गुन्हा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad pawar Nitesh And Nilesh rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी अलिकडेच दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी केली. आता पुन्हा एकदा नितेश आणि निलेश या राणे बंधुंवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडत त्यांच्या जीवास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडीली आरोप-प्रत्यारोपांमध्ये एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे.

राणे बंधूंवर मुंबईत गुन्हा

  • नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.
  • मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबत तक्रार केली होती.
    अनेक कलमांअंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अनिल देशमुख मराठा, नवाब मलिक मुस्लिम – नितेश राणे

  • काही दिवसांपूर्वीच आझाद मैदानावर वादग्रस्त भाष्य नितेश राणे यांनी केले होते.
  • अनिल देशमुख मराठा समाजातून येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते आणि नवाब मलिक मुस्लीम समाजातून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.
  • हे सगळं दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरुन होत आहे.
  • आमदार नितेश राणे यांनी समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजात वाद निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

 

निलेश राणे थेट दाऊदचा माणूस म्हणाले…

  • माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
  • अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत.
  • काही वेगळे राजकारण आहे का?
  • शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो.
  • ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिक यांना पाठीशी घालतात आणि अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेता.
  • मग नवाब मलिक यांच्याशी तुमचे संबंध काय? कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा?
  • नवाब मलिक पवार कुटुंबीयांसाठी काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती आहे? असा मला संशय वाटतो.
  • नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही, हे पवारच सांगतील, असंही ते म्हणाले होते.

Tags: anil deshmukhNawab MalikNilesh ranenitesh ranesharad pawarअनिल देशमुखनवाब मलिकनितेश राणेनिलेश राणेशरद पवार
Previous Post

‘काश्मीर फाईल्स’ला वाढता प्रतिसाद, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही कौतुक!

Next Post

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रथमेश आबनावे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जाहीर सत्कार

Next Post
Satkar - Kapote, Joshi, Abnave, Pushkar, Khore (1)

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रथमेश आबनावे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जाहीर सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!