मुक्तपीठ टीम
मुक्तपीठनं दोन आठवड्यापूर्वी दिलेली बातमी खरी ठरली आहे. टीव्ही रेटिंग सुरु झाल्यापासून सातत्यानं रेटिंगमध्ये वाढ नोंदवत असलेलं एकमेव मराठी न्यूज चॅनल झी २४ तासच्या फ्री डिशवरील अस्तित्वावर वाद होण्याची शक्यता वर्तवली होती. ती खरी ठरली आहे. देशातील दूरदर्शन वाहिन्यांचा समूह असणाऱ्या प्रसार भारतीनं टीव्ही चॅनल रेटिंगचं काम करणाऱ्या बार्ककडे झीच्या ९ वाहिन्यांचे रेटिंगचे रिपोर्टिंग थांबवण्याची मागणी केली आहे.
जर रेटिंगच थांबलं तर झीच्या ९ चॅनल्ससाठी खूप मोठा फटका असेल. पण तसे नाही झाले आणि मर्यादित कारवाई झाली तरी
त्यामुळे टीव्ही रेटिंगमध्ये जवळपास ३० टक्के वाटा असणाऱ्या फ्री डिशवरील रेटिंग गमवावं लागण्याचा धोका झी २४ तास समोर उभा ठाकलाय. तर त्यांच्यावरील संकट हे अंतर कमी होत असलेल्या टीव्ही 9 या सध्याच्या नंबर १ न्यूज चॅनलला तसेच तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझासाठी इष्टापती ठरण्याची शक्यता आहे. प्रसार भारतीने केलेल्या मागणी प्रमाणेच इतरही काही चॅनल्स समुहांनी अशा तक्रारी केल्या आहेत. अर्थात लगेच या गुरुवारपासूनच रेटिंगमधून झीचे हे ९ चॅनल्स बाहेर जातील, असं नाही. तशी कारवाई नंतरच्या आठवड्यानंतरही होऊ शकेल.
नेमका काय घडलं, काय बिघडलं?
- प्रसार भारतीने BARC इंडियाला झी मीडियाच्या नऊ अनएन्क्रिप्टेड चॅनेलच्या रेटिंगचे रिपोर्टिंग थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
- त्यांच्या आरोपांनुसार झी मीडियाचे फक्त झी न्यूज आणि झी हिंदुस्तान हे दोनच न्यूज चॅनल फ्रि डिशवर अधिकृतरीत्या उपलब्ध आहेत.
- इतर झी २४ ताससह झी मीडियाचे इतर नऊ अनएन्क्रिप्टेड चॅनेल DD च्या बुकेचा भाग नसूनही अपलिंकिंग नियमांना बगल देत FTA सेट-टॉप-बॉक्सेससाठी उपलब्ध केले जात आहेत.
- सोप्या भाषेत याचा अर्थ असा की झीचे पे चॅनल हे फक्त पे चॅनल म्हणून दिसले पाहिजेत ते फ्री चॅनलसारखीही फ्री डिश सेट टॉप बॉक्सवर उपलब्ध करून दिली जात आहेत.
- डीडी फ्री डिश ज्या उपग्रहाचा वापर करते त्याच GSAT 15वरील KU बँड ट्रांस्पॉंडर्सचा वापर करत झीच्या या नऊ न्यूज चॅनल्सचा अनएन्क्रिप्टेड अपलिंक केले जाते.
- त्यामुळे ते फ्रि चॅनलसारखे फ्रि डिशवरही उपलब्ध होतात.
प्रसार भारतीची माहिती प्रसारण खात्याकडेही तक्रार!
- प्रसार भारतीने I&B मंत्रालयाला आठवण करून दिली आहे की त्यांनी FTA STBs वर एनक्रिप्ट न केलेल्या चॅनेलच्या उपलब्धतेचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे.
- तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे.
झी मीडियाच्या कोणत्या चॅनल्सविरोधात तक्रार
- झी मध्य प्रदेश/छत्तीसगड
- झी बिहार/झारखंड
- झी उत्तर प्रदेश/उत्तराखंड
- झी सलाम
- झी राजस्थान
- झी २४ कलाक
- झी पंजाब/हरियाणा/हिमाचल प्रदेश
- झी २४ तास
- झी ओडिसा
प्रसार भारतीचा तक्रारीमुळे काय घडणार?
- अर्थात प्रसार भारतीने मागणी केली म्हणून झीच्या नऊ वाहिन्यांच्या रेटिंगचे रिपोर्टिंग लगेच थांबेल असंही नाही.
- पण इतर चॅनल हाऊसेसनी जोर लावला तर तसं होऊ शकेल.
- किंवा किमान फ्रि डिशवरील झी २४ ताससह नऊ चॅनल्सची उपलब्धता बंद होईल.
- आता जर झीच्या या नऊ चॅनल्सचे रेटिंग बार्कने थांबवले तर झीला मोठा फटका बसेल.
- जर रेटिंग बंद नाही झाले, पण फ्रि डिशवरील अस्तित्व गमावले तर झीच्या या ९ चॅनल्सच्या ३० टक्के टीव्ही रेटिंग मार्केटमधील भाग गमावण्याचा फटका बसेल.
- त्यामुळे हे नऊ चॅनल्स रेटिंगच्या स्पर्धेत किमान ३० टक्क्यांनी मागे जातील.
प्रसार भारतीकडून नव्या मार्गदर्शक तत्वांचीही मागणी
- प्रसार भारतीच्या तक्रारीनुसार झी मीडियाने आपल्या दोन प्रमुख हिंदी चॅनल्ससाठी अधिकृत स्लॉट घेतले आहेत.
- पण इतर ९ प्रादेशिक चॅनल्ससाठी डिश टीव्हीच्या टेलिपोर्टचा वापर करत त्यांना अनधिकृतरीत्या फ्रि टू एअर चॅनलसारखे उपलब्ध करून दिले आहे.
- प्रसारभारतीनुसार, त्या अनधिकृत वितरणातील डेटाचा अहवाल न देण्यासाठी BARC ला पत्र लिहिणे हा या अनैतिक प्रथा थांबवण्याचा एक मार्ग आहे.
- आता, अशाप्रकारे नियमांना बगल देत अनधिकृत वितरण थांबवण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे हे माहिती प्रसारण मंत्रालयावर अवलंबून आहे, ते लवकरच अपेक्षित आहे, अशी भूमिकाही प्रसार भारतीने मांडली आहे.
हेही वाचा:
डीडी फ्रीडिश आता ४ कोटी ३० लाख घरांपर्यंत पोहोचली! देशातील सर्वात मोठी डीटीएच सेवा!!
डीडी फ्रीडिश आता ४ कोटी ३० लाख घरांपर्यंत पोहोचली! देशातील सर्वात मोठी डीटीएच सेवा!!
गेल्या आठवड्यात किती होतं कुणाचं रेटिंग? मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!
टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?
बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?