Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, विशेष, सरळस्पष्ट
0
TV Rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

गुरुवारचा दिवस टीव्ही चॅनल्ससाठी निकालाचा दिवस. आज जाहीर झालेल्या नव्या टीव्ही रेटिंगमध्ये पुन्हा एकदा टीव्ही 9 मराठीने आपलं मराठीतील न्यूज चॅनल नंबर १चं स्थान कायम राखलं आहे. त्यांना किंचित ०.४चा फरक पडला आहे. तर झी २४ तास दुसऱ्या क्रमांकावर राहतानाच ०.४ ने पुढे गेले आहे. एबीपी माझा न्यूज चॅनल याही गुरुवारी ०.१ वाढीसह तिसऱ्या क्रमांकावरच आहे. चौथ्या क्रमांकावरील साम, पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमत आणि सहाव्या क्रमांकावरील लोकशाही किंचित फरकासह आहे तेथेच आहेत. झी २४ या आठवड्यात पुढे सरसावल्याने पहिल्या क्रमांकापासून १.६ ने दूर आहे, मात्र त्याचवेळी त्यांच्या दूरदर्शनच्या फ्रि डिशवरील एकमेव अस्तित्वाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

चार आठवड्यांच्या रेटिंगवर नवं रेटिंग

  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

 

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.४ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे. त्यांच्यात ०.४ची घट आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २६.८% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.४ ची वाढ आहे.
  • एबीपी माझा १८.८ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात ०.१ ची वाढ आहे.
  • चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही ११.९% मार्केट शेअरसह आहे.त्यांच्यात ०.१ची घट आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ८.६ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.१ची वाढ आहे.
  • सहाव्या क्रमांकावर नव्यानं सुरु झालेलं लोकशाही न्यूज चॅनल ५.६ % मार्केट शेअरसह आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.

 

समजून घ्या कोणाचं कसं?

  • पहिल्या क्रमांकावरील टीव्ही 9च्या रेटिंगमध्ये ०.४ अशी घट होत असताना दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासच्या रेटिंगमध्ये तेवढीच वाढ झाली आहे. त्यामुळे आता फरक हा १.६ वर आला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी झाल्यास झी २४ तास हा टीव्ही 9च्या पहिल्या स्थानासाठी धोका ठरु शकतो.
  • एबीपी माझासाठी पुढे सरसावणं तेवढं सोपं नसणार. त्यांना मोठ्या फरकासह काही आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुन्हा आपले स्थान किंवा किमान नंबर २च्या स्थानावर जाता येईल. अपवाद जर झी २४ तासच्या फ्रि डिशवरील अस्तित्वावर काही हालचाली झाल्या तर मोठा बदल अशक्य नाही.
  • साम, न्यूज 18 लोकमत या दोन चॅनलची स्थिती काहीशी जशी आहे तशी आहे.
  • लोकशाही या नव्या न्यूज चॅनलचे वितरण चांगले आहे. त्यांना मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणखी चांगले प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यासाठी चांगला टाइम स्पेंट हा दिलासा देणारा प्रोत्साहनात्मक भाग आहे. त्याचा अर्थ त्यांना पाहणारे प्रेक्षक हे त्यांचं चॅनल जास्त वेळ पाहत आहेत. जाहिरातदारांच्या दृष्टीने रेटिंग एवढाच टाइम स्पेंटही महत्वाचा असतो. कमी रिच असणाऱ्या चॅनलच्या बाबतीत हा फायदा आहे.

 

आता फ्री डिशचा वाद पेटणार?

  • झी २४ तासची मुसंडी ही दूरदर्शनच्या फ्री डिशवरील एकमेव मराठी न्यूज चॅनल असल्याने झाली असल्याची कुजबुज मराठी टीव्ही विश्वात सुरु झाली आहे.
  • याआधीही उदय निरगुडकर संपादक असताना त्याचाच फायदा झाला होता. त्यानंतर फ्रि डिशवरून दूर केल्यानंतर रेटिंगही घसरले होते.
  • आताही काही मराठी चॅनल्स २४तासला फ्रि डिशमुळे फायदा मिळत असल्याचा मुद्दा मांडून विरोध करण्याची शक्यता आहे.
  • फ्रि टू एअर नसून पे चॅनल असूनही फ्रि डिशमुळे त्यांना ग्रामीण भागात मोठा फायदा होतो, असा आक्षेप घेतला जात आहे.
  • अर्थात असा आक्षेप घेतला जात असला तरी सध्याचे संपादक निलेश खरे येण्याच्याआधीपासूनच झी २४ तास हे चॅनल फ्री डिशवर गेले होते, त्यामुळे तो निव्वळ फ्रि डिशचाच फायदा आहे, असं सांगणं हे काहीसं कंटेट टीमवर अन्यायाचंच ठरेल, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
  • एकीकडे फ्री डिशचा फायदा मिळाल्यामुळे झी २४ तास पुढे जात असेल तर त्याचवेळी इतर मराठी न्यूज चॅनल्ससारखं फ्री टू एअर नसून पे चॅनल असल्याचाही फटका नजरेआड करू नका, असेही सांगितले जाते.
  • जर इतर चॅनल्सना फ्रिश डिशबद्दल बार्ककडून आधीप्रमाणे काही निर्णय मिळवता आला तर त्याचा मोठा फटका २४ तासला आणि मोठा फायदा एबीपी माझाला होईल. ते किमान २ऱ्या क्रमांकावर सरकू शकतील. टीव्ही 9 लाही त्याचा फायदा होईल. त्यातही त्यांचे स्थान अधिकच पक्कं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

गेल्या आठवड्यात किती होतं कुणाचं रेटिंग?

 

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:

 

 

 

 

 


Tags: ABP MajhaTV RatingTV9Zee24taasएबीपी माझाझी २४ तासटीव्ही 9टीव्ही रेटिंगमराठी न्यूज चॅनल
Previous Post

“नैना प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर व भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही!”

Next Post

टेंभुर्णी ते कुसळंब आणि कुसळंब ते येडशी रस्त्याचे चौपदरीकरण होणार- दत्तात्रय भरणे

Next Post
Dattatray Bharne

टेंभुर्णी ते कुसळंब आणि कुसळंब ते येडशी रस्त्याचे चौपदरीकरण होणार- दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!