Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबासाठी मोफत प्राणायाम ध्यान शिबिर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
art of living

मुक्तपीठ टीम

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या महाराष्ट्र विभागातर्फे यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त काही वेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. २४ ते ३० जानेवारी या कालावधीत ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून माजी सैनिक, त्यांचे कुटुंबियासह तमाम भारतीयांना घरबसल्या सात दिवस विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबिराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भारतीय जवानांनी देशासाठी गाजवलेले शौर्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाच्या कथा ‘शौर्यगाथा’ मधून सांगितल्या जाणार आहेत. ध्यान शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक आहे, त्यासाठी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमधील बातमीची लिंक क्लिक करून मुक्तपीठ वेबसाइटवर तपासा.

 

‘महाराष्ट्र मेडिटेट्स’मध्ये देशातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. यात कारगील युद्धातील शहीद कॅप्टन सौरभ कालिया याचे वडील एन. जे. कालिया,जम्मू काश्मीर येथील अतिरेकीविरोधी लढ्यातील शाहिद मेजर मयांक वैष्णोई यांच्या पत्नी स्वाती वैष्णोई,कारगिल युद्धात शाहिद होण्यापूर्वी भारतीय इतिहासातील सर्वात कठीण अशा पर्वतीय युद्धात नेतृत्व केलेले शाहिद कप्तान विक्रम बात्रा यांचे आई-वडील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून ‘शौर्यगाथा’ सांगणार आहेत.

 

ध्यान शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांचे मानसिक स्थिरता, मनशांती लाभावी, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढावी यासाठी दि २४ ते ३० जानेवारी या काळात दररोज वेगवेगळ्या वेळी विनामूल्य, ऑनलाईन प्राणायाम ध्यान सत्रे आयोजित केली आहेत. ही सर्वांसाठी खुली असून यात सहभागी होण्यासाठी https://aolmh.in/Maharashtra-Meditates या वेबसाईटवर नावनोंदणी करावी.

 

शौर्य, त्यागास देणार अनोखी मानवंदना!

आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्टेट टीचर कोऑर्डिनेटर राहुल सदाशिव पाटील म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिक तरुण वयात कुटुंबीय व नातेवाईकांपासून दूर राहिले. त्यांच्या शौर्यास व त्यागास मानवंदना देण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबीर आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच अन्य नागरिकांनी ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या सत्रात सहभागी व्हावे.”

 

गेल्यावर्षी दोन लाख नागरिक सहभागी

कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात म्हणून २०२१ पासून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगकडून मोफत प्राणायाम ध्यान शिबीर घेतले जात आहेत. ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’च्या पहिल्या टप्प्यात जवळपास 2 लाख नागरिक प्राणायाम ध्यान शिबिरात सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या अनेकांनी प्राणायाम सरावामुळे फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. तसेच कोविडमुळे निर्माण झालेली भीती आणि चिंता कमी झाल्याचे सांगितले. त्यांच्यापैकी बरेचजण आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशनच्या प्रशिक्षकांकडून शिकवली जाणारी ‘सुदर्शन क्रिया’ ही श्वसनप्रक्रियाही शिकले आहेत.

 

डिसेंबरमध्ये २० हजार लोकांनी घेतला अनुभव

कोरोना महामारीच्या विरोधात द्याव्या लागणाऱ्या लढ्यात मदत करण्यासाठी ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या प्रकल्पाच्या पहिल्या भागातील यशाने प्रोत्साहित होऊन आर्ट ऑफ लिव्हिंगने या प्रकल्पाचा दुसरा भाग मागील वर्षाच्या डिसेंबरमध्ये सुरु केला. त्यात २०,००० लोकांनी भाग घेतला आणि प्राणायाम ध्यानाचा फायदा अनुभवला. या सत्रातील प्रत्येक भागाचा कालावधी दररोज अर्धा तास असा होता. लोकांच्या सोयीनुसार सुमारे १४ तुकड्या आयोजित केल्या गेल्या.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Art of LivingEx-Servicemangood newsMaharashtra DivisionMaharashtra MeditatesmuktpeethPranayama Meditation Campआर्ट ऑफ लिव्हिंगगुरुदेव श्री श्री रविशंकरचांगल्या बातम्याप्राणायाम ध्यान शिबिरमहाराष्ट्र मेडिटेट्समहाराष्ट्र विभागमाजी सैनिकमुक्तपीठ
Previous Post

सेला बोगदा प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण, भारतात १३ हजार फूट उंचीवर जगातील सर्वात लांब बोगदा

Next Post

तरूणाईमध्ये एकेकाळी क्रेझ असणारी येझदी बाईक आता पुन्हा लाँच!

Next Post
Yezdi

तरूणाईमध्ये एकेकाळी क्रेझ असणारी येझदी बाईक आता पुन्हा लाँच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!