Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेला बोगदा प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण, भारतात १३ हजार फूट उंचीवर जगातील सर्वात लांब बोगदा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Sela tunnel project

मुक्तपीठ टीम

अरुणाचल प्रदेशातील सेला बोगदा प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण झाले आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओने २२ जानेवारीला बोगद्यासाठी शेवटचा स्फोट घडवून आणला. सेला बोगदा १३ हजार फूट उंचीवर बांधलेला जगातील सर्वात मोठा डबल लेन बोगदा असेल. सेला बोगदा प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. चीनच्या सीमेवरील अरुणाचल प्रदेशातील हा बोगदा सैनिकांसाठी तवांग सेक्टरच्या पुढे जाण्यासाठी लवकरच गेम चेंजर ठरेल. संरक्षण मंत्रालया दिलेल्या माहितीनुसार, ९८० मीटर लांबीच्या बोगद्यासाठी शेवटचा स्फोट एका आभासी समारंभाद्वारे झाला. बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी रिमोटद्वारे बटण दाबले. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग आणि तवांग जिल्ह्यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा बारामाही एकमेव रस्ता आहे.

 

सेला बोगदा प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य

  • बोगदा १ आणि बोगदा २ प्रकल्पांतर्गत, तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांदरम्यान दोन बोगदे बांधले जात आहेत.
  • १ हजार ५५५ मीटर लांबीचे ट्विन ट्यूब चॅनल तयार करण्यात येत आहे. दुसरा बोगदा ९८० मीटर लांब आहे.
  • सेला बोगदा १३ हजार ५०० फूट उंचीवर असलेला जगातील सर्वात मोठा द्वि-लेन बोगदा असेल.
  • टनेल २ मध्ये रहदारीसाठी बाय-लेन ट्यूब आणि एस्केप ट्यूब असेल. म्हणजे मुख्य बोगद्याशेजारी त्याच लांबीचा आणखी एक बोगदा बांधला जात आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत कामी येईल.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येत असलेल्या या बोगद्यावर बर्फवृष्टीचा परिणाम होणार नाही.
  • प्रकल्पांतर्गत दोन रस्ते ७ किमी आणि १.३ किमीचे बांधले जातील.

 

हा प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा का आहे?

  • सेला बोगदा ३१७ किमी लांबीच्या बालीपारा-चाहरद्वार-तवांग रस्त्यावर आहे.
  • अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग आणि तवांग जिल्ह्यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे.
  • तवांग सेक्टरमधील एलएसीपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. खराब हवामानात हेलिकॉप्टरही उडू शकत नाही.
  • हा रस्ता सर्व हवामानात खुला राहिल्यास स्थानिक लोकांसोबतच भारतीय लष्करालाही हालचाल करता येईल.
  • लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याने केलेले अतिक्रमण पाहता या बोगद्याचे महत्त्व वाढले आहे.

 

बोगदा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सेला बोगदा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Arunachal PradeshBorder Road Organizationexcavation completedgood newsIndiaLieutenant General Rajiv ChaudharymuktpeethSela tunnel projectअरुणाचल प्रदेशखोदकाम पूर्णपंतप्रधान नरेंद्र मोदीबॉर्डर रोड ऑर्गनायझेशनभारतमुक्तपीठलेफ्टनंट जनरल राजीव चौधरीसेला बोगदा प्रकल्प
Previous Post

शेतीसाठी ड्रोन वापरण्यासाठी सरकारचे प्रोत्साहन, ड्रोन खरेदीसाठी संस्थांना १० लाखांपर्यंत अनुदान!

Next Post

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबासाठी मोफत प्राणायाम ध्यान शिबिर

Next Post
art of living

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबासाठी मोफत प्राणायाम ध्यान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!