Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पीएम किसान सन्मान: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहावा हप्ता तुमच्या खात्यात! कसे ते जाणून घ्या…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
PM KISAN YOJANA

मुक्तपीठ टीम

शनिवारी एक जानेवारीला नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे हा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाचे काम करणार आहेत. तुम्ही या रकमेची वाट पाहत असाल तर एक महत्वाची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. पीएम किसानमधील फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी आवश्यक केले आहे. त्यामुळे डिसेंबर-मार्चसाठीचा दोन हजार रुपयांचा हप्ता एक जानेवारीला तुमच्या खात्यात येईल की नाही, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

 

पीएम किसानबद्दल जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमची स्थिती तपासा

  • स्टेटसमध्ये FTO जनरेट झाले असेल किंवा FTO will generated असे लिहिलेले दिसत असेल तर तुमचा हप्ता नक्की येईल.
  • असे लिहिले नसेल तर पीएम किसानची नवीन यादी तपासा.

 

तुम्हाला ते पुढीलप्रमाणे तपासता येईल:

  • सर्वप्रथम तुमच्या संगणकावर PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ उघडा.
  • मुख्यपृष्ठावर मेनू बार दिसेल. येथे ‘फार्मर कॉर्नर’ वर जा आणि लाभार्थी यादीवर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव यांचे नाव भरण्याचे काम करा.
  • एक नवीन यादी तुमच्या समोर येईल.

 

त्रुटी कशा तपासायच्या ते जाणून घ्या…

1. सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या संगणकावर https://pmkisan.gov.in/ पोर्टल उघडा.

2. येथे तुम्हाला पेमेंट सक्सेस टॅब अंतर्गत भारताचा नकाशा दिसेल.

3. डॅशबोर्ड खाली लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. तुम्ही त्यावर क्लिक करताच तुम्हाला एक नवीन पेज उघडलेले दिसेल.

5. हे व्हिलेज डॅशबोर्डचे पृष्ठ आहे, येथे ते तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मदत करेल.

6. सर्व प्रथम राज्य निवडण्याचे काम करा. तुम्ही महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र निवडा.

7. राज्य निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव, नंतर तालुक्याचे आणि नंतर तुमचे गाव.

8. यानंतर शो बटणावर क्लिक करा.

9. यानंतर, तुम्हाला ज्या बटणाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करण्याचे काम करा.

10. हे केल्यावर संपूर्ण तपशील तुमच्या समोर दिसतील.

 

टीप:

गाव डॅशबोर्डच्या खाली चार बटणे दिसतील. किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर Data Received वर क्लिक करण्याचे काम करा. ज्या शेतकऱ्याचे पैसे बाकी आहेत, त्यांनी दुसऱ्या बटणावर क्लिक करावे. त्यामुळे तसे होण्याचे कारण तुम्हाला कळेल.


Tags: farmersNarendra modipm kisan samman nidhi yojanaपंतप्रधान नरेंद्र मोदीपीएम किसान सन्मानशेतकरी
Previous Post

बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ देणार ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ

Next Post

वाघांच्या १२१ मृत्यंपैकी ६० अभयारण्यांबाहेर अनैसर्गिकरीत्या! सरकार म्हणते व्याघ्र संवर्धन आणि इतर बाबी विसरु नका…

Next Post
tigers death

वाघांच्या १२१ मृत्यंपैकी ६० अभयारण्यांबाहेर अनैसर्गिकरीत्या! सरकार म्हणते व्याघ्र संवर्धन आणि इतर बाबी विसरु नका...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!