Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाघांच्या १२१ मृत्यंपैकी ६० अभयारण्यांबाहेर अनैसर्गिकरीत्या! सरकार म्हणते व्याघ्र संवर्धन आणि इतर बाबी विसरु नका…

वाचा वाघांच्या मृत्यूंबाबत केंद्रीय वनखात्याचे स्पष्टीकरण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, निसर्ग
0
tigers death

मुक्तपीठ टीम

सरत्या वर्षात देशभरात १२६ वाघांचे मृत्यू ओढवले. त्यात अभयारण्यांबाहेर ६० वाघांचे अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाले, असा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, तसं करणं योग्य नसल्याचे मत केंद्र सरकारच्या वनखात्याने व्यक्त केले आहे. वन खात्याच्या पत्रकानुसार, २०२१ या वर्षात झालेले वाघांचे मृत्यू काही प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारे अधोरेखित केले आहेत ज्यामुळे देशातील व्याघ्र संवर्धनाबाबत चुकीचे चित्र निर्माण झाले आहे. वाघांच्या मृत्यूचे कारण ठरवण्यासाठीच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करताच ६० वाघांचे मृत्यू अनैसर्गिक ठरवणे योग्य नाही, असा दावा केला आहे.

 

केंद्रीय वनखात्याने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे:

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा वापर त्यांनी या वृत्तांकनामध्ये करणे ही चांगली बाब आहे मात्र त्यांनी ज्या प्रकारे त्याची मांडणी केली आहे त्यामुळे एका प्रकारे धोक्याचा इशारा दिला जात आहे आणि त्यांनी देशातील वाघांच्या मृत्यूची हाताळणी करण्याच्या प्रक्रियांना आणि भारत सरकारच्या शाश्वत तांत्रिक आणि आर्थिक हस्तक्षेपांच्या परिणामांमुळे व्याघ्र संवर्धनात झालेल्या नैसर्गिक लाभांना विचारात घेतलेले नाही.

 

वाघांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना यश

  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे अस्तित्वाच्या काठावर असलेल्या वाघाला सुस्थितीत आणण्यात यश आले आहे.
  • २००६, २०१०, २०१४ आणि २०१८ या वर्षात केलेल्या चार वर्षीय अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या निष्कर्षातून त्याची प्रचिती येत आहे.
  • या निष्कर्षांमध्ये असे दिसले आहे की वाघांच्या संख्येत वार्षिक ६ टक्के निकोप वृद्धीदराची नोंद झाली आहे.
  • यामुळे नैसर्गिक हानी भरून निघत आहे आणि भारतीय संदर्भात वाघांच्या अधिवासांच्या क्षमतेची पातळी कायम राहत आहे.
  • २०१२ ते २०२१ या काळात देशात वाघांच्या मृत्यूची वार्षिक सरासरी 98 च्या जवळपास होती.
  • वार्षिक पाहणीत दिसून आल्याप्रमाणे भक्कम वृद्धी दरामुळे कमी झालेली ही संख्या भरून काढली जात आहे.
  • त्याशिवाय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सध्या सुरू असलेल्या केंद्र पुरस्कृत प्रोजेक्ट टायगर योजनेंतर्गत वाघांची अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
  • यामुळेही वाघांच्या अवैध शिकारीला आणि पकडण्याला लक्षणीय स्वरुपात आळा बसला आहे.

 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण त्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी वाघांच्या मृत्यूची आकडेवारी त्याचबरोबरwww.tigernet.nic.in या डेडिकेटेड पोर्टलवर उपलब्ध करून देताना संपूर्ण पारदर्शकता राखत आहे. ज्यामुळे लोक या आकडेवारीचे तर्कसंगत विश्लेषण करू शकतात.

 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये वाघांच्या १२६ प्रकरणांपैकी ६० वाघांचे मृत्यू अवैध शिकार, अपघात, संरक्षित भागाच्या बाहेर मानव- पशु संघर्ष यामुळे झाल्याचे म्हटले आहे. मात्र, वाघांच्या मृत्यूचे विश्लेषण करताना अवलंब केलेल्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. एनटीसीए एका समर्पित आदर्श परिचालन पद्धतीद्वारे वाघाच्या अनैसर्गिक मृत्यूचे विश्लेषण करण्यासाठी कठोर नियमावलीचा अवलंब करत असते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. राज्यांनी त्यासंदर्भात न्यायवैद्यकीय, हिस्टोपॅथोलॉजी, नेक्रोप्सी अहवाल देऊन, विविध छायाचित्रे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांसह योग्य पुरावे दिले असल्यास ही प्रक्रिया केली जात नाही. या कागदपत्रांचे सविस्तर विश्लेषण केल्यानंतरच व्याघ्र अभयारण्यांच्या बाहेर या ६० वाघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. या विश्लेषणाच्या आधारावर प्रसारमाध्यमे देशासमोर वस्तुस्थिती मांडतील अशी अपेक्षा आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची खळबळ निर्माण होणार नाही आणि नागरिकांमध्ये धोक्याचा इशारा असल्याची भावना निर्माण होणार नाही.


Tags: 2021indian forest departmenttigerstigers deathकेंद्रीय वनखातेवाघ
Previous Post

पीएम किसान सन्मान: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहावा हप्ता तुमच्या खात्यात! कसे ते जाणून घ्या…

Next Post

देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी, महाराष्ट्रानंतर राजस्थानात वृद्धाचा मृत्यू

Next Post
2nd death from omicron

देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी, महाराष्ट्रानंतर राजस्थानात वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!