Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ देणार ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ

महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूरांचे निर्देश

December 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
yashomati thakur with mavim

मुक्तपीठ टीम

बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून, महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेत, यासाठी बचतगटाच्या उत्पादनांना माविममार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

माविम अंतर्गत बचतगटामार्फत तयार होणाऱ्या वस्तूच्या विक्री व प्रदर्शनबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, उपसचिव विलास ठाकूर आदी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘माविम’अंतर्गत बचतगटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी नव माध्यमांचा वापर करावा. यासाठी बचतगटातील महिलांना पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटींग याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटातील महिलांचा त्यांच्या उत्पादनाची माहिती देणारा व्हिडिओ तयार करुन तो ऑनलाइन माध्यमावर प्रसृत करावा. यासाठी विभागाच्या सोशल मिडीया प्लॅटफॅार्मचा वापर करावा, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्य, विभाग व जिल्हास्तरावर बचतगटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करावे व त्याबाबत वर्षभराचे नियोजन तयार करावे. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रदर्शन घेणे शक्य न झाल्यास, ऑनलाईन प्रदर्शनासाठी कायमस्वरुपी वेबपोर्टल तयार करावे. ‘माविम’ने नुकतेच वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे तीन सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळाली आहे, असेही  यशोमती ठाकूर यांनी सांगितले.


Tags: MAVIMonline marketing platformself help groupऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठबचतगटमाविम
Previous Post

भालगाव व वडाळा महादेव येथील पी.बी.बी.एसस्सी. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ

Next Post

पीएम किसान सन्मान: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहावा हप्ता तुमच्या खात्यात! कसे ते जाणून घ्या…

Next Post
PM KISAN YOJANA

पीएम किसान सन्मान: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहावा हप्ता तुमच्या खात्यात! कसे ते जाणून घ्या…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!