मुक्तपीठ टीम
शनिवारी एक जानेवारीला नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे हा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाचे काम करणार आहेत. तुम्ही या रकमेची वाट पाहत असाल तर एक महत्वाची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. पीएम किसानमधील फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी आवश्यक केले आहे. त्यामुळे डिसेंबर-मार्चसाठीचा दोन हजार रुपयांचा हप्ता एक जानेवारीला तुमच्या खात्यात येईल की नाही, ते जाणून घेणे आवश्यक आहे.
पीएम किसानबद्दल जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमची स्थिती तपासा
- स्टेटसमध्ये FTO जनरेट झाले असेल किंवा FTO will generated असे लिहिलेले दिसत असेल तर तुमचा हप्ता नक्की येईल.
- असे लिहिले नसेल तर पीएम किसानची नवीन यादी तपासा.
तुम्हाला ते पुढीलप्रमाणे तपासता येईल:
- सर्वप्रथम तुमच्या संगणकावर PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ उघडा.
- मुख्यपृष्ठावर मेनू बार दिसेल. येथे ‘फार्मर कॉर्नर’ वर जा आणि लाभार्थी यादीवर क्लिक करा.
- हे केल्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव यांचे नाव भरण्याचे काम करा.
- एक नवीन यादी तुमच्या समोर येईल.
त्रुटी कशा तपासायच्या ते जाणून घ्या…
1. सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या संगणकावर https://pmkisan.gov.in/ पोर्टल उघडा.
2. येथे तुम्हाला पेमेंट सक्सेस टॅब अंतर्गत भारताचा नकाशा दिसेल.
3. डॅशबोर्ड खाली लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
4. तुम्ही त्यावर क्लिक करताच तुम्हाला एक नवीन पेज उघडलेले दिसेल.
5. हे व्हिलेज डॅशबोर्डचे पृष्ठ आहे, येथे ते तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मदत करेल.
6. सर्व प्रथम राज्य निवडण्याचे काम करा. तुम्ही महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र निवडा.
7. राज्य निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव, नंतर तालुक्याचे आणि नंतर तुमचे गाव.
8. यानंतर शो बटणावर क्लिक करा.
9. यानंतर, तुम्हाला ज्या बटणाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करण्याचे काम करा.
10. हे केल्यावर संपूर्ण तपशील तुमच्या समोर दिसतील.
टीप:
गाव डॅशबोर्डच्या खाली चार बटणे दिसतील. किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर Data Received वर क्लिक करण्याचे काम करा. ज्या शेतकऱ्याचे पैसे बाकी आहेत, त्यांनी दुसऱ्या बटणावर क्लिक करावे. त्यामुळे तसे होण्याचे कारण तुम्हाला कळेल.