Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनअभावी मृत्यूंच्या ऑडिटची संसदीय समितीची शिफारस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
parliment

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाची दुसरी लाट अधिकच भयंकर होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोक मृत्यूमुखी पडले. या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संसदीय स्थायी समितीने कोरोना कालावधीमधील मृत्यूंसंदर्भातील आपला अहवाल सादर केला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यालयाने कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृतांच्या ऑडीटची आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी अशी शिफारस या अहवालामध्ये केली आहे.

सरकारच्या दुर्लक्षामुळे समिती नाराज!!

  • सरकारने या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ऑक्सिजनच्या तुटवड्याआभावी खास करुन करोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी झालेल्या मृत्यूंची चौकशी करावी अशी शिफारस करण्यात आली आहे, असं या सामितीचं नेतृत्व करणारे समाजवादी पक्षाचने नेते राम गोपाल यादव यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.

समितीच्या अहवालात काय म्हटलंय?

  • मंत्रालयाने राज्यांशी समन्वय साधून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करावे आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे दस्तऐवज जमा करुन यासंदर्भातील सविस्तर माहिती गोळा केल्याने सरकारची प्रतिसादात्मक यंत्रणा अधिक सक्षम होईल.
  • त्याचप्रमाणे सरकार हे जबाबदारपणे काम करत असून धोरणात्मक सावधगिरीबद्दल गांभीर्याने विचार करत असल्याचं दिसून येईल.
  • अशाप्रकारच्या आरोग्यासंदर्भातील परिस्थितीजन्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी याची मदत होईल

सरकारी संस्थांकडून अधिक पारदर्शकता आणि जबाबदारीची अपेक्षा!!

  • सरकारी संस्थांकडून अधिक पारदर्शकता आणि अधिक जबाबदारीची अपेक्षा असल्याचे समितीने म्हटले आहे.
  • मंत्रालयाने ऑक्सिजन-प्रभावित कोरोना मृत्यूची काळजीपूर्वक चौकशी करावी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य प्रकारे भरपाई दिली जाईल याची खात्री करावी.

दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते

  • अहवालात म्हटले आहे की, “कोरोना रुग्णांच्या कुटुंबांनी ऑक्सिजनसाठी विनवणी केल्याची आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी रांगेत उभे राहण्याची अनेक उदाहरणे आहेत.
  • जेव्हा हॉस्पिटलमध्ये केवळ काही तासांचा ऑक्सिजन पुरवठा शिल्लक होता त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यावेळी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन संपत असल्याच्या तसेच यासंदर्भात मदत करण्याचं आवाहन करणाऱ्या बातम्या दिल्या होत्या.
  • एप्रिल २०२१ मध्ये वैद्यकीय ऑक्सिजनच्या वितरणातील कथित गैरव्यवस्थापनासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले.
  • उच्च न्यायालयाने मे २०२१ मध्ये केंद्र सरकारला कोरोनाची परिस्थिती सुधारत असलेल्या राज्यांमधून ऑक्सिजनचे टँकर दिल्लीकडे वळवण्यास सांगितले होते.

मंत्रालयाने राज्यांशी समन्वय साधला पाहिजे…

  • याआधी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीसंदर्भात राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी माहिती द्यावी अशी विनंती केली होती.
  • यावेळी मिळालेल्या माहितीनुसार २० राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही असं समोर आलं होतं.
  • मात्र आता, समितीने आपल्या निरीक्षणात, मंत्रालयाने राज्यांशी समन्वय साधला पाहिजे.
  • ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करावे.

Tags: Central Health Deptcoronaoxygen cylinderआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयऑक्सिजनकोरोना
Previous Post

मुख्यमंत्र्याच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटप व सरकारी आदेश काढण्याची वेळ!

Next Post

पोलीस ठाण्यात गोळीबाराचा आरोप, आ. सरवणकरांचं ३ दिवसांनंतर पिस्तुल जप्त!

Next Post
sada sarvankar

पोलीस ठाण्यात गोळीबाराचा आरोप, आ. सरवणकरांचं ३ दिवसांनंतर पिस्तुल जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!