Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्र्याच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटप व सरकारी आदेश काढण्याची वेळ!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nana Patole And Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी तसेच लम्पी आजाराने ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील काही भागातील जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. हा रोग जास्त पसरू नये यासाठी वेळीच औषधोपचार करणे व हा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. लम्पी आजारावर आवश्यक लसीचा साठा राज्य सरकारने ICMR कडून Lumpy Provac IND लसींचा साठा मागवावा. तसेच जनावरांना लम्पीची लागण होताच उपचार करण्यासाठी लागणारी औषधे राज्य सरकारने केंद्र सरकारडून कडून किंवा खुल्या बाजारातून विकत घ्यावीत. लम्पी आजारावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर राज्यातील पशुधनाला मोठा फटका बसून शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. भविष्याती धोका लक्षात घेता सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे परंतु राज्यातील शिंदे फडणीस सरकार गणेशोत्सवात व्यस्त होते आणि अजूनही हार तुरे सत्कार यातच त्यांचा वेळ जात असल्याचे दिसते. सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले परंतु राज्य सरकार त्यांना भरीव आर्थिक मदत देऊ शकले नाही. सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे आमि तीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित सरकार शेतकरी विरोधी आहे हे दिसून आले आहे परंतु शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे असेही पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सरकारी व भाडोत्री गर्दी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेस गर्दी जमण्यासाठी पैसे वाटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांनी या सभेला हजर रहावे असे लेखी आदेश महिला व बालकल्याण विभागाने दिल्याचे समजले. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी असे लेखी आदेशाचे पत्र काढण्यामागे कोण आहे याची चौकशी केली पाहिजे. सभेला गर्दी जमवण्यासाठी शिंदे यांच्यावर ही वेळ यावी हे दुर्दैवच म्हणावे लागले.


Tags: Cm Eknath ShindeCongressINCNana PatilePaithanनाना पटोलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

विसरणं वाढतंय फार…काय कारण? कसा कराल उपाय?

Next Post

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनअभावी मृत्यूंच्या ऑडिटची संसदीय समितीची शिफारस!

Next Post
parliment

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनअभावी मृत्यूंच्या ऑडिटची संसदीय समितीची शिफारस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!