मुक्तपीठ टीम
यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. संसदेच्या अधिवेशनात २३ दिवसांत १७ बैठका होणार आबेत. अमृत काळामध्ये अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे कामकाज आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होत आहे.
Winter Session, 2022 of Parliament will commence from 7 December & continue till 29th December having 17 sittings spread over 23 days. Amid Amrit Kaal looking forward to discussions on Legislative Business & other items during the session. Looking forward for constructive debate. pic.twitter.com/4LnYvEaUmd
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) November 18, 2022
गुजरात आणि हिमाचल निवडणुकांमध्ये अधिवेशन सुरु होणार…
- हे पहिलेच अधिवेशन असेल जेव्हा उपाध्यक्ष जगदीप धनखर राज्यसभेचे कामकाज चालवतील.
- सरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करत असताना, विरोधक अनेक विषयांवर चर्चेची मागणी करणार आहेत.
- गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुका असल्या तरी हे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात काय होणार?
- या अधिवेशनात कोणताही कोरोना प्रोटोकॉल लागू नसेल अशी सूत्रांची माहिती आहे.
- सरकार संसदेच्या आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याची योजना आखत आहे. तर विरोधक तातडीच्या विषयांवर चर्चेची मागणी करू शकतात.
- विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब होण्याची शक्यता आहे.
- नुकतेच निधन झालेल्या विद्यमान खासदारांमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचाही समावेश आहे.
- काँग्रेस खासदार राहुल गांधी या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत, कारण त्यावेळी ते भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.