Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमदार खरेदी-विक्री: भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांना समन्स आलेलं प्रकरण आहे तरी काय?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
B.L Santosh

मुक्तपीठ टीम

देशात विरोधकांच्या आमदारांना खरेदी करण्याचा आरोप भाजपावर वारंवार केला जात आहे. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीआरएसच्या काही आमदारांना खरेदी करण्याचा आणि त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. आता या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तेलंगणा पोलिसांनी भाजपाचे सर्वोच्च नेते आणि पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष यांना समन्स पाठवले आहे. एसआयटीने त्यांना २१ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांनी तसे न केल्यास एसआयटी त्यांना अटकही करू शकते.

आतापर्यंत तीन जणांना अटक!!

  • समन्स बजावल्यानंतर भाजपा नेते बी.एल.संतोष यांनीही अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.
  • याप्रकरणी तेलंगणा पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत.
  • आतापर्यंत चार राज्यांतील सात ठिकाणी पोलिस पोहोचले आहेत.
  • याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

  • २६ ऑक्टोबरच्या रात्री, टीआरएस आमदार पी रोहित रेड्डी यांच्या तक्रारीच्या आधारे, रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा, नंद कुमार आणि सिंहाजी स्वामी यांच्या विरोधात लाचखोरी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या तरतुदींनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • प्राथमिक माहितीनुसार, रोहित रेड्डी यांनी आरोप केला की, आरोपींनी त्यांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिली.
  • त्या बदल्यात त्यांनी टीआरएस सोडून भाजपामध्ये जावे लागेल, अशी अट घातली होती.

आमदारांना फोनवरून धमक्या येत असल्याच्या तक्रारी

  • चार टीआरएस आमदार पायलट रोहित रेड्डी, बी हर्षवर्धन रेड्डी, रेगा कांथा राव आणि गुव्वाला बलराजू यांनी अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत असल्याची तक्रार केली आहे.
  • त्यांना फोनवरून टीआरएस सोडून भाजपामध्ये येण्यास सांगण्यात आले आहे.
  • पैशाचे आमिषही दिल्याचा आरोप आहे.
  • आमदारांच्या तक्रारीनंतर रायदुर्गम, बंजारा हिल्स, घाटकेसर आणि गचीबोवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Tags: B.L. SantoshBJPTelanganaTelangana PoliceTRSTRS MLA Poaching Caseटीआरएसतेलंगणातेलंगणा पोलीसबीएल संतोषभाजपा
Previous Post

संसदेचं हिवाळी अधिवेशन ७ ते २९ डिसेंबरपर्यंत

Next Post

दर ८ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू, जाणून घ्या कार्व्हिकल कॅन्सरचा धोका!

Next Post
Cervical Cancer

दर ८ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू, जाणून घ्या कार्व्हिकल कॅन्सरचा धोका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!