Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवर साथ: मुंबईत रुग्णांची वाढती संख्या, नियंत्रणासाठी असे सुरु आहेत प्रयत्न…

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
measles

मुक्तपीठ टीम

मुंबईत गोवराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आतापर्यंत मुंबईत गोवरचे १६९ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गोवरमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ६४ जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशात मुंबई मनपा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क झाली आहे.

नियंत्रणासाठी असे सुरु आहेत प्रयत्न…

  • मुंबईत ० ते २ वयोगटातील मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे.
  • यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे.
  • काहींनी एकच डोस घेतला आहे.
  • तर काहींनी लसिकरणच केलेले नाही.
  • त्यामुळे अशा २० हजार मुलांवर मुंबई मनपाने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे.
  • त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
  • ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
  • गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत.
  • यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे.
  • धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे.
  • गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.

मुंबईत रुग्णांची वाढती संख्या…

  • मुंबईत २३ लाख ८७ हजार ३८६ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे.
  • त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २८६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
  • जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १७६ रुग्ण आढळून आले आहेत.
  • ० ते ८ महिन्याचे १८, ९ ते ११ महिने १ ते ४ वर्ष ६४, ५ ते ९ वर्षे २८, १० ते १४ वर्षे ९, १५ आणि त्यावरील ९ असे एकूण १३७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
  • त्यापैकी ७ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
  • ४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १३ हजार ९६२ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

Tags: BMChealthmeaslesmumbaiआरोग्यगोवरमुंबईमुंबई मनपा
Previous Post

इंडियन ऑइलमध्ये ४६५ जागांवर ट्रे़ड आणि टेक्निशियन अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

संसदेचं हिवाळी अधिवेशन ७ ते २९ डिसेंबरपर्यंत

Next Post
parliment

संसदेचं हिवाळी अधिवेशन ७ ते २९ डिसेंबरपर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!